SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

1000 रुपयांमध्ये उघडा पोस्टात खाते आणि दरमहा मिळवा 5 हजार रुपये; कसे ते जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई :

सध्याच्या काळ हा आर्थिक अस्थिरतेचा आहे. अजूनही अनेक लोक कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत. भविष्य अजूनही काही लोकांसाठी अंधुकच आहे. अशा काळात नियमितपणे पैसे देणाऱ्या योजना किंवा कमी पैशाच्या गुंतवणुकीत चांगले रिटर्न देणारे पर्याय शोधणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एकदम जबरदस्त पर्याय सांगणार आहोत. ज्यात पैसे तर सुरक्षित असतीलच पण रिटर्नही चांगले मिळतील.

Advertisement

मंथली इन्कम स्कीम अकाउंट (POMIS) असे या योजनेचे नाव असून  या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैसे या योजनेत १०० टक्के सुरक्षित राहतील. त्याची परिपक्वता (मॅच्युरिटी) ५ वर्षांची आहे.

काय आहे योजना आणि कसा होईल फायदा :-

Advertisement

जर तुम्ही या योजनेत सिंगल खाते उघडले, तर ४.५ लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. यामध्ये ६.६ टक्के वार्षिक व्याजाने संपूर्ण वर्षभरात मिळणारी रक्कम १२ महिन्यांत विभागली जाते. प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम हे तुमचे मासिक उत्पन्न असते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एका खात्याद्वारे किमान ४.५ लाख रुपये जमा करू शकता. वार्षिक ६.६ टक्के व्याजदरानुसार या रकमेवर एकूण २९,७०० रुपये व्याज मिळेल. तसेच या योजनेत संयुक्त खात्याद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. व्याजदरानुसार या रकमेवर एकूण ५९,४०० रुपये व्याज मिळेल.

Advertisement