SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता पेट्रोल-डिझेल स्वस्तात मिळणार.., ‘या’ अ‍ॅप्सवर एकदा क्लिक करुन तर पाहा…!

भारतीय तेल कंपन्यांकडून राेज पेट्राेल-डिझेल दरवाढीचा शॉक बसतोय.. गेल्या 14 दिवसांत तब्बल 12 वेळा इंधन दरवाढ झाली.. या 12 दिवसांत पेट्राेल तब्बल 8 रुपये 40 पैशांनी महागलं.. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.. रस्त्यावर वाहन चालविताना हजारदा विचार करावा लागतोय..

अशा वेळी तुम्हाला स्वस्तात पेट्रोल-डिझेल मिळत असेल तर.. विश्वास बसत नाही ना.. पण हे खरंय..सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय.. त्यावर असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जवळ स्वस्त दरात इंधन कुठे मिळेल, हे शोधू शकता.. चला तर मग, इंधन दराची सारी माहिती देणाऱ्या अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेऊ या..!

Advertisement

स्मार्ट ड्राईव्ह (SmartDrive)

भारत पेट्रोलियम कंपनीचे (BPCL)चे ‘स्मार्ट ड्राईव्ह’ (SmartDrive) हे अ‍ॅप असून, त्यावर इंधनाच्या रोजच्या दराची माहिती देण्यात येते.. शिवाय, स्थानिक इंधन स्टेशनचे लोकेशन आणि किमतीही या अ‍ॅपवर पाहायला मिळतात. या अ‍ॅपद्वारे तुमच्या जवळ स्वस्त इंधन कुठे मिळते, हे काही मिनिटांत शोधू शकता..

Advertisement

मॅप माय फ्युअल (MapMyFuel)

‘मॅप माय फ्युअल’ हे ‘क्राउड सोर्स’ केलेले अ‍ॅप आहे. त्यावर तुम्हाला एकमेकांना पेट्रोल-डिझेलच्या किमतीची माहिती देता येते. शिवाय ‘सीएनजी’बाबतची माहितीही या अ‍ॅपवर मिळते. या अ‍ॅपमध्ये ‘आयओसीएल’ (IOCL), ‘एचपीसीएल’ (HPCL), ‘बीपीसीएल’ (BPCL), रिलायन्स पेट्रोलियम, एस्सार पेट्रोलियम आणि शेल इंडिया अंतर्गत पेट्रोल पंपांची माहिती मिळते.

Advertisement

फ्युअल@आयओसी ([email protected])

‘फ्युअल@आयओसी’ हे इंडियन ऑइल कंपनीचं अ‍ॅप आहे. त्यावर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती तपासता येतात. मात्र, हे अ‍ॅप केवळ ‘अ‍ॅपल’ आणि ‘अँड्रॉइड’ स्मार्टफोनवरच उपलब्ध आहे. त्यातील ‘Locate Us’ टॅबवर क्लिक केल्यावर जवळच्या सर्व पेट्रोल पंपांची माहिती मिळते.

Advertisement

वेबसाइटवर चेक करा

‘आयओसीएल’ (IOCL), ‘एचपीसीएल’ (HPCL), ‘बीपीसीएल’ (BPCL), रिलायन्स पेट्रोलियम, एस्सार पेट्रोलियम, अशा सगळ्या प्रमुख ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइट्सवर शहरानुसार रोजच्या इंधनाचे दर आणि तुलना करण्यासाठी मागील दर पाहायला मिळतात..

Advertisement

शिवाय ग्राहकांना 92249-92249 या क्रमांकावर ‘RSP DEALER CODE’ असा मेसेज पाठवून तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेता येतात.. भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे…

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement