SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

iPhone 12 वर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट; लुट लो…

मुंबई :

आयफोन सगळ्यांना आवडतो. एक बाईक, लोकप्रिय कंपनीचा मोबाईल हे आजकालच्या तरून पिढीसाठी बंधनकारक झाल्यासारखं आहे. कारण याशिवाय तरुण पिढीचं पानही हलत नाही. आपल्याही हातात आयफोन असावा, हे प्रत्येकाचं स्वप्न असत. पण बजेट नसल्याने अनेकांचा हिरमोड होत असतो. मात्र आता iPhone घेण्याचे तुमचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण आज आम्ही आपल्याला एका तगड्या ऑफरविषयी सांगणार आहोत.

Advertisement

‘आयफोन’ खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. iPhone 12 ला आता स्वस्त खरेदी करण्याची एक नामी संधी चालून आलेली आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर नाही तर चक्क आता  अ‍ॅपलच्याच अधिकृत डिस्ट्रीब्यूटर असणाऱ्या इंडिया स्टोअर वर तुम्ही जास्तीत जास्त सुट मिळवून iPhone 12 खरेदी करू शकता.

स्टोर डिस्काउंट आणि बँक कॅशबॅकसह एक्सचेंज डिस्काउंटचा फायदा तुम्ही iPhone 12 खरेदी करत असताना मिळवू शकता. स्मार्टफोनच्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 65,900 रुपये आहे. यावर iStore ग्राहकांना 5 हजार रुपये डिस्काउंट देत आहे. HDFC बँक डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4 हजार रुपये इंस्टंट कॅशबॅकचा फायदा मिळेल. डिस्काउंट आणि कॅशबॅकचा फायदा मिळाल्यास फोनची किंमत 56,900 रुपयांवर येईल.

Advertisement

ग्राहक आपल्या जुन्या स्मार्टफोन्सला त्यांची पार्टनर वेबसाइट Cashify किंवा Servify वर विकू शकतात. सध्या वापरत असलेला फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला आयफोन 12 वर 18 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच या आयफोनला तुम्ही 38,990 रुपये किंमतीत स्वस्तात खरेदी करू शकता.

Advertisement