SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ 4 गोष्टी करून केला जातो ऑनलाईन Fraud; सेकंदात होतं बँक अकाउंट खाली

जिथे पैसा, तिथे धोका हे तत्त्व सायबर गुन्ह्यांमध्येही दिसून येते. ई-शॉपिंग, ऑनलाइन बँकिंग, मोबाइल अॅपमधून होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या प्रमाणात पैसे हडप केले जातात. कोरोना काळात online म्हणजेच डीजीटल व्यवहार करण्याचे प्रमाण खूप वाढले. पण असे व्यवहार किंवा बँकेतील (bank) एखादं काम तुम्ही ऑनलाईन करीत असाल तर तुम्ही त्याची काळजी घ्या. त्यावर अनेक ऑनलाईन फ्रॉड करणा-याचं लक्ष असतं. तसेच त्यांच्या तावडीत तुम्ही एकदा सापडला तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागेल.

 

Advertisement

डिजिटल इंडिया(Digital India)मुळे एकीकडे लोकांच्या अनेक समस्या संपल्यात, तर दुसरीकडे ठगांना फसवणूक किंवा फसवणूक करण्याचं नवं व्यासपीठही मिळालं आहे. इंटरनेटवर सक्रिय असलेले सायबर ठग संधी मिळताच निष्पाप लोकांना आपला बळी बनवतात आणि काही सेकंदात त्यांच्या कष्टाची कमाई घेऊन जातात.

इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला शेअर करत आहोत. तुम्हीही आर्थिक व्यवहार online करत असाल तर या टिप्स कायमच लक्षात ठेवा.

Advertisement
  1. अनेकदा सायबर फ्रॉडस्टर्स कस्टमर सर्विसमधून बोलत असल्याचं सांगत स्क्रिन शेअरिंग App डाउनलोड करण्यासाठी सांगतात. त्यानंतर स्क्रिन पिन मागून युजरच्या मोबााइल किंवा कंप्यूटरचा अॅक्सेस मिळवतात आणि डिव्हाइसची संपूर्ण आवश्यक माहिती चोरी होते.आणि या माहितीत जर आपल्या बँक डीटेल्स असतील तर पुढच्या काही मिनिटात पैसे काढले जातात.
  2. आपल्यापैकी अनेक लोक असे असतील, ज्यांना UPI या प्रकारची पूर्ण माहिती नसते परिणामी हीच online चोरट्यांना संधी असते. फ्रॉडस्टर्स ऑनलाइन सेल्स प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करुन फोनवर लिंक पाठवतात आणि UPI पिन टाकण्यास सांगतात. त्यानंतर लिंकवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण अॅक्सेस समोरच्या व्यक्तीकडे जातो आणि अकाउंटमधून पैसे कट होतात.
  3. अनेकदा मेसेजवर लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक केल्यानंतर QR कोडकडे रिडायरेक्ट केलं जातं. हा कोड स्कॅन केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्यांना तुमचा पैसे घेण्याचा अॅक्सेस मिळतो आणि अकाउंट खाली केलं जातं.
  4. अनेकदा फ्रॉडस्टर्स मोठ्या कंपनीशी मिळती-जुळती सेम दिसणारी वेबसाइट बनवतात. युजर खरी वेबसाइट समजून तुमचे पर्सनल डिटेल्स त्यात दिले जातात. त्यानंतर पुढे ऑनलाइन फ्रॉड केला जातो.