SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचे दर ‘जैसे थे’?; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई :

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. अशातच लग्नसराईचा मोसम असल्याने सोनेखरेदी जोरात सुरु आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढच होताना दिसत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसल्याने भारतीय बाजारात अनेक वस्तूंचे दर महागले. सोन्या-चांदीच्या दरातही काहीशी अस्थिरता पाहायला मिळतेय. आज सोन्या-चांदीच्या दरात फारसा फरक दिसून आला नाही. खरंतर गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीचे जे दर होते त्यात साधारण किंचित रूपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement

10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,950 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,950 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,460 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,000 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,400 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,000 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,400 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 668 रुपये आहे.

कसे तपासाल तुमच्या शहरातील सोन्याचे दर :-

Advertisement

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

Advertisement