SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी गेली का? आता टेन्शन घेऊ नका भावांनो; ‘या’ सरकारी योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार

मुंबई :

आयटी तसेच इतर खाजगी क्षेत्रात नोकऱ्या जाण्याची सर्वात जास्त भीती आहे. अजूनही कोरोनाचे वातावरण अपेक्षित असे निवळलेले नाही. सगळ्याच क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात आर्थिक अस्थिरता आहेच. जर तुमचीही कधी नोकरी गेली तर ही योजना तुमच्या कामी येऊ शकते. नोकरी गेली तरी टेन्शन नॉट भावांनो, मोदी सरकारची ही योजना तुम्हाला 2 वर्षांपर्यंत पगार देणार आहे.

Advertisement

नेमकी काय आहे ही योजना :-

  • योजनेचे नाव ‘अटल बीमित व्यक्ती कल्याण’ योजना असे आहे.
  • नोकरी गेल्यास सरकार तुम्हाला आर्थिक मदत करेल.
  • ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला मिळेल.
  • मागील 90 दिवसांच्या सरासरी उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम बेरोजगार व्यक्तीला मिळेल.

योजनेसाठी कशी करा नोंदणी :- जर आपली नोकरी गेली आहे तर  ESIC च्या वेबसाइटवर जाऊन अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.

Advertisement

ही लिंक घ्या आणि लाभ घ्या :-  https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf

या व्यक्तींना लाभ मिळणार नाही :-

Advertisement
  • चुकीच्या वर्तणुकीमुळे कंपनीतून काढून टाकले असल्यास त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • फौजदारी खटला दाखल झाला असल्यास किंवा कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृती (VRS) घेतली असल्यास अशा व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो. कोविड -19 साथीच्या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

Advertisement