SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : ITI उत्तीर्णांसाठी बंपर भरती; अधिक माहितीसाठी क्लिक करा

मुंबई :

बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. लोकांसमोरील आर्थिक संकटे अजूनही हटलेली नाहीत. अशा काळात सरकारने ITI उत्तीर्णांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आणलेली आहे. Electronics Corporation of India Limited या कंपनीत बंपर भर्ती निघालेली आहे. इच्छुक आणि योग्य असणाऱ्या उमेदवारांनी तातडीने अर्ज करावयाचे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) ने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि फिटरमधील कनिष्ठ तंत्रज्ञांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तब्बल 1600 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत.

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या careers.ecil.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. १ एप्रिल २०२२ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भर्ती :-

Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 814
फिटर – 627
इलेक्ट्रिशियन – 184
रिक्त पदांची एकूण संख्या – 1625 पदे

या महितीकडे द्या लक्ष :-

Advertisement
  • अर्जदारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • निवडलेल्या उमेदवारांना ECIL च्या कोणत्याही कार्यालयात (संपूर्ण भारत) आणि त्याच्या ग्राहकांच्या साइटवर पोस्टींग मिळू शकते.
  • आवश्यकतेनुसार 24-तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी हवी.