SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता अंबानी नाही तर अदानींची हवा; अंबानींना मागे टाकत मारली अदानींनी ‘ती’ बाजी

मुंबई :

गेल्या काही वर्षात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना विविध व्यवसायात स्पर्धा देणारे प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी आता अजून एक विक्रम केला आहे. जिथे जिथे रिलायन्स डील करू पाहते, तिथे तिथे अदानी समूह डोळे लावून काम करतो. आता अदानी यांनी अंबानीने अजून एके ठिकाणी मागे टाकले आहे. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्स’नुसार, त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरवर गेली आहे.

Advertisement

चालू वर्षीच गौतम अदानी यांनी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरण्याचा मान पटकावला आहे. आतापर्यंत मुकेश अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. अंबानी यांची एकूण संपत्ती 99 अब्ज डॉलर आहे. तर 1 अब्ज डॉलरने अदानी हे अंबानींच्या पुढे आहेत.

‘ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्स’नुसार अव्वल स्थानी ‘टेस्ला’चे संस्थापक एलन मस्क आहेत. तर गौतम अदानी हे दहाव्या क्रमांकावर असून मुकेश अंबानी हे अकराव्या स्थानी आहेत. हिरे व्यापारी म्हणून व्यवसायात आलेले गौतम अदानी हे वयाच्या विसाव्या वर्षी लखपती झाले होते. तर आता त्यांचा समावेश ‘सेंटीबिलिनेयर्स क्लब’मध्ये झाला आहे. शंभर अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती कमविणाऱ्यांना ‘सेंटीबिलिनेयर्स’ म्हटले जाते.

Advertisement

आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या अंबानी आणि अदानी यांना आर्थिक वर्ष 2021-22 चांगलेच फलदायी ठरले. या वर्षात अदानी यांच्या संपत्तीमध्ये 69.70 टक्क्यांची आणि अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 20.76 टक्क्यांची भर पडली. सरत्या आर्थिक वर्षात अदानी यांनी दररोज 756 कोटी रुपयांची आणि अंबानी यांनी 378 कोटी रुपयांची कमाई केली.

Advertisement