SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 4 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ IPL: पंजाब किंग्जच्या 8 बाद 180 धावा, चेन्नई सुपरकिंग्जला 54 धावांनी केलं पराभूत, चेन्नईच्या 18 षटकांत सर्व गडी गमावून 126 धावा

✒️ चंद्रपूर, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी दिसल्या आकाशातुन पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या जळत्या वस्तू, ते अवशेष सॅटेलाईटचे असल्याचा संशोधकांचा दावा

Advertisement

✒️ महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर, राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 43.5 अंश सेल्सिअस

✒️ भोकरदन तालुक्यातील शेतकरी कुटुंबाला हिंगोलीतील तरुणीने 3 लाखांना लुबाडले; पहिल्या दिवशी भेट, दुसऱ्या दिवशी लग्न, तिसऱ्या रात्री नववधू दागिने घेऊन पसार

Advertisement

✒️ डीमॅट खातेधारकांना आता 30 जून 2022 पर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार, सेबीच्या नव्या निर्णयानुसार केवायसीला मुदतवाढ

✒️ हॉकी विश्वचषक: भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, दुसऱ्या सामन्यात भारताने जर्मनीचा 2-1 ने केला पराभव, संघाचा सलग दुसरा विजय

Advertisement

✒️ आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या एकाच दिवशी दुप्पट होणार, सध्या राज्यात 13 जिल्हे असून आता हा आकडा 26 वर पोहोचणार

✒️ ‘मास्टर’ फेम थलापती विजयचा ‘बीस्ट’ सिनेमा येत्या 13 एप्रिलला रिलीज होणार, यूट्यूबवर जबरदस्त ट्रेलर झाला रिलीज

Advertisement

✒️ सध्या राजकारणाचा स्तर घसरत चाललाय, पॉलिटिकल वॉर गँगवॉर होऊ नये; फडणवीस यांच्या उपस्थितीतील एका कार्यक्रमात मंत्री अशोक चव्हाण यांचे उद्गार

✒️ REALME 9 4G स्मार्टफोन 7 एप्रिल 2022 रोजी भारतात होणार लॉंच, रियल मी कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून दिली माहिती
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement