SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक..! नाशिकमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, डबे रुळावरुन घसरले, अनेक प्रवाशी जखमी..!

महाराष्ट्रातील नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.. नाशिक जिल्ह्यातील लहवीत ते देवळाली दरम्यान एलटीटी-जयनगर (पवन) एक्सप्रेसला आज (ता. 4) मोठा अपघात झाला.. पवन एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात रेल्वेतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समजते..

मुंबई-जयनगर (बिहार) पवन एक्स्प्रेस (11061 एलटीटी-जयनगर) इगतपुरीकडून नाशिककडे येताना लहवीत स्थानकाजवळ आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. लहवीतजवळ रेल्वेमार्ग उखडून एकामागोमाग एक डबे घसरले. त्यांची चाके जमिनीत रुतली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. घबराट पसरली..

Advertisement

Advertisement

अपघात झालेल्या रेल्वेमार्गापासून 500 मीटरवरच दुसरा रेल्वेमार्ग आहे.. मात्र, सुदैवाने या अपघातात हा रेल्वेमार्ग बाधित झाला नाही. हा अपघात नेमका कसा झाला, अपघातामागील नेमकं कारण काय? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, रेल्वे रुळ तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातं..

दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच रेल्वे, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.. अन्य प्रवाशांसाठी राज्य परिवहन व मनपा शहर बससेवेच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पाठविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली..

Advertisement

मध्य रेल्वेने ट्विट करुन या अपघाताची माहिती दिली.. अपघातानंतर मध्य रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ‘सीएसएमटी’ स्टेशनच्या टीसी कार्यालय – 55993 आणि एमटीएनएल 02222694040  हे हेल्पलाईन नंबर रेल्वेकडून जारी करण्यात आले आहेत.

नाशिकमधील या अपघातामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक हे विस्कळीत झालंय. काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Advertisement

रद्द केलेल्या गाड्या

  • मनमाड पंचवटी एक्सप्रेस
  • मुंबई -अदीलाबाद  नंदीग्राम एक्सप्रेस

मार्ग वळवलेल्या गाड्या

Advertisement
  • सीएसएमटी – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस – वसई रोड जळगाव भुसावळ मार्गे वळवली आहे.
  • सीएसएमटी हावडा दुरान्तो एक्सप्रेस – वसई रोड जळगाव भुसावळ मार्गे वळवली
  • एलटीटी प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस – लोणावळा पुणे दौड मनमाड मार्गे वळवली.

दरम्यान, या अपघातात रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झालंय. इगतपुरी व भुसावळ स्थानकाहून रेल्वेचे आपत्कालीन सहाय्यता पथक महाकाली क्रेनसह अपघातस्थळी आलेय. अपघातग्रस्त रेल्वे रुळावर घेणे नि रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान 8 ते 10 तास लागण्याची शक्यता असल्याचे समजते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement