SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहिल. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. कामाता चांगला बदल होईल. हास्याने भरलेला आनंदी दिवस घालवतील. त्यातील काहींना सरप्राईज गिफ्ट्सही मिळू शकते. कामाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते.

वृषभ (Taurus): कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. प्रसिद्धी नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. घरात गैरसमज होतील. वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो. कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडण टाळावेत. चर्चा नंतरसाठी केली जाऊ शकते. नवीन कल्पनांवर काम करून तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल.

मिथुन (Gemini) : ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजुने राहिल. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल. आर्थिक स्थिती ढासळेल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. महागड्या भेटवस्तूंच्या मागे असलेले प्रेम हे अपेक्षित नसेल. उदासीन प्रतिक्रिया देऊ नये. काही प्रमाणात मजा करायला काहीच हरकत नाही.

कर्क (Cancer) : धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.प्रवास करावा लागेल. अधिक खर्च देखील वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या, खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कोणत्याही कामाची सुरूवात करू शकता. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल. बहिणी भाऊ यांचेशी थोडे मतभेद होऊ शकतात.

Advertisementसिंह (Leo) : पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. मनासारखे भोजन मिळेल, जमीन व्यवहारात फायदा होईल. मनावरचा ताण हलका होईल. मित्रपरिवारांच्या झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न राहिल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनासाथीशी मधूर संबंध राहतील. दिवस शांततेत घरी घालवा. ताण घेऊ नका. दिवस बरा आहे.

कन्या (Virgo) : भेटवस्तू देण्यास हरकत नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वादापासून दूर राहा. संयमाने वागणे आवश्यक आहे. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. फायदा होईल, घरी पाहुणे होतील. योग्य तसा प्रतिसाद मिळेल. विक्री चांगली होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील, जवळचे प्रवास होतील.

तुळ (Libra) : आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद मिळतील. संततीकडून शुभवार्ता मिळतील. त्यांची प्रगती होईल. गृहस्थ जीवनात सुख- समाधान लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. घर, शेती खरेदीचे मनसुबे रचले जात असतील तर त्यांना मूर्त स्वरूप येईल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. काहींना मित्रांसह सहलीला जाता येईल. एखाद्या सौद्यात फायदा होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : घरात नातेवाईक गोळा होतील. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल. मनात सकारात्मक विचार राहतील. त्यामुळे काही अडचणी आल्या तरी आपण त्यातून मार्ग काढाल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. जीवनसाथीचे प्रेम मिळेल.

Advertisement


धनु (Sagittarius) : व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकतो. कामानिमित्त लांबचा प्रवास संभवतो.

मकर (Capricorn) : चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. महत्त्वाच्या प्रकल्पात तुमच्यासाठी खास जबाबदारी राहील. घरी उत्सवी वातावरण राहील. भावंडांच्या भेटी होतील. मुलांशी संवाद साधा. मनामध्ये आनंद राहील. यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी असेल.

कुंभ (Aquarious) : दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. अतिविचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. कुटुंबाची काही जबाबदारी तुमच्यावर येईल. आर्थिक लाभ होतील मात्र खर्च जपून करा.

मीन (Pisces) : छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल. खर्चाचे नियोजन नीट करा. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मनासारखे भोजन मिळेल. आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. वास्तव लक्षात घेऊन आर्थिक योजना करा. एकत्र काम करणाऱ्यांकडून तुम्हाला आनंद मिळेल

Advertisement