SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त ‘इतक्या’ वर्षात रक्कम होईल दुप्पट; ‘ही’ सरकारी स्कीम देतेय दमदार व्याजदर

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असते. या ठेव योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमी परताव्यासाठी प्रसिद्ध आहेत. या बचत योजनांमुळे लोकांना पैशाची बचत करणे सुलभ होते. या ठेव योजनांचा व्याजदर सरकार ठरवते. काही काही योजना या बँकेपेक्षा जास्त व्याजदर देणाऱ्या आहेत.

आज आम्ही तुम्हाला एका अशाच दमदार योजनेविषयी सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana) तुमच्यासाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना ही सर्वाधिक रिटर्न देणारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिचं खातं उघडणं आवश्यक असतं.

Advertisement

भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या नावाने मुलींसाठी एक योजना सुरू केली आहे. Post Office SSY सध्या 7.6 टक्के वार्षिक दराने व्याज मिळत आहे. भविष्यातही या योजनेअंतर्गत 7.6 टक्के व्याजदर राहील असे गृहित धरले, तर या योजनेंतर्गत जमा केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी 9.4 वर्षे लागतील.

या खात्यात वर्षभरात तुम्हाला कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणुकीची मर्यादा आहे. सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते.

Advertisement

हे खाते 21 वर्षांसाठी असते. तसेच जेव्हा मुलगी लग्न करण्यास पात्र असते, तेव्हा तिला मॅच्युरिटीचे पैसे मिळतात. हे खाते 21 वर्षांसाठी असले तरी त्यात गुंतवणूक फक्त 15 वर्षांसाठी करावी लागेल. म्हणजे जर तुम्ही तुमची मुलगी चार वर्षाची असताना हे अकाऊंट सुरु केले तर ते 25 वर्षापर्यंत मॅच्युर होते. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी तुम्ही यातून पैसे काढू शकता.

Advertisement