SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल दरवाढीने केले हैराण; आजच्या वाढीसह तुमच्या शहरात काय आहे भाव, वाचा एका क्लिकवर

मुंबई :

महागाईने आधीच नको नको केले असताना रोजच पेट्रोलचे भाव वाढत आहेत. गेल्या 2 आठवड्यात तब्बल 8 रुपये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. 25 पैसे पेट्रोलचे दर वाढल्याने आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. मात्र तरीही त्यांनी इंधन दरवाढीवर एक शब्द बोललेला नाही. देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून ते आतापर्यंत 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटरने महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज 3 एप्रिलला राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दरात 80 पैसे प्रति लीटर वाढ केली आहे.

Advertisement

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती भडकलेल्या असतानाही गेल्या 4 महिन्यांपासून देशात इंधन दरवाढ झालेली नव्हती. मात्र आता अच्छे दिन संपले असून दरवाढीचा बॉम्ब फुटला आहे. राजधानी दिल्लीतील पेट्रोलचा दर आता 103.41 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल 94.67 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 84 पैशांनी वाढले असून एका लिटरसाठी 117.41 रुपये आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 85 पैशांची वाढ झाल्याने एका लिटरसाठी 102.64 रुपये मोजावे लागत आहेत.

चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 108.21 रुपये आणि 99.04 प्रति लिटर झाले आहेत. येथे पेट्रोलच्या किंमती आज 75 पैसे आणि डिझेलच्या किंमती 76 पैशांनी वाढल्या आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 84 पैशांनी वाढल्याने येथे एका लिटरसाठी 113.03 रुपये मोजावे लागत आहेत, तर डिझेलच्या किंमती 80 पैशांनी वाढल्या असून एका लिटरची किंमत 97.82 पैशांवर पोहोचली आहे. बंगळुरूमध्ये एक लिटर पेट्रोल 108.99 आणि डिझेल 92.83 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

Advertisement

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर :- 

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Advertisement