SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उल्कापात की रॉकेट बुस्टर? विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात दिसलं नेमकं काय; ‘त्या’ जिल्ह्यात कोसळले अवशेष

चंद्रपूर :

कालपासून समाजमाध्यमावर काही दृष्य व्हायरल होत आहेत. काही लोकांना तो pk मधील ‘जलता हुआ गोला’ वाटला तर काहींना उल्कापात तर काहींनी अजून अजून नको ते अंदाज बांधले. तर झालं असं की, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून आकाशात पश्चिम दिशेकडे अनेक ठिकाणी उल्कापातासारख्या प्रकाशमान वेगात प्रवास करणाऱ्या जळत्या वस्तू दिसल्या. काही लोकांनी त्याचे फोटो घेतले आणि सोशल मिडीयावर शहानिशा न करता व्हायरल केले. चित्रपटांमध्ये शोभावं अशा या घडामोडीने तर्कवितर्कांना उधाण आलं. हा उल्कापात आहे का का उपग्रहाचे तुकडे आहेत का विदेशी देशांनी भारतावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली कूटमोहीम आहे अशा अनेक शक्यतांविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली. पण तरीही प्रश्न उरतोच… जे दिसलं ते नेमकं काय? उल्कापात की रॉकेट बुस्टर की अजून काही?

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार हे तज्ञांनी असे अंदाज सांगितले आहेत की, हे अवशेष अवकाश यान किंवा अंतराळ प्रयोशाळा किंवा उपग्रहाचे अवशेष असू शकतात. हे रॉकेट बुस्टर असल्याचीही शक्यता काही तज्ञांनी बोलून दाखवली आहे.

उल्कापात हा बहुधा काही सेकंद होतो. परंतु उल्का पडायला इतका वेळ लागत नाही. त्यामुळे आज बघायला मिळालेला हा उल्कापात नसून कदाचित एखाद्या अवकाश यानाचे किंवा अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष, किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असु शकतात, अशी माहिती डॉ. अनिल बंड यांनी दिली.

Advertisement

हे तुकडे ‘इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर’चे असल्याचे खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद यांनी सांगितले. हे एखादे जुने सॅटेलाईट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळलं असां, असा अंदाज खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे.

श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या ‘इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचे’च असावेत. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चित.

Advertisement

अवकाशात फिरत असलेले अर्धा किमी ते काही कीमी आकाराचे खगोलीय पिंड अचानक पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणासोबत होणाऱ्या घर्षणाने जळायला लागतात. बहुतांश वेळा हे पिंड किंवा उल्का हवेतच जळून नष्ट होतात. परंतु क्वचित वेळी(लाखात ऐक वेळा) यातील न जळलेला ऐकदोन किलो वजनाचा तुकडा जमिनीवर पडू शकतो.

शनिवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचं स्थानिकांना दिसले. दरम्यान, सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. आकाशात ही रिंग जेव्हा होती ती लाल तप्त होती. ती एवढ्या जोराने जमिनीवर पडली की मातीमध्ये ती रुतली. ही रिंग आठ फुटाच्या व्यासाची आहे.

Advertisement