SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ प्रसिद्ध हिरोच्या पॅनकार्डचा गैरवापर करुन घेतले कर्ज, कर्जाची रक्कम पाहून डोक्याला हात लावाल..!

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, तसतसे लोकांना लुटण्याचे फंडेही तयार होत आहेत.. त्यातूनच गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमचे प्रकार वाढल्याचे दिसतेय.. आतापर्यंत या सायबर चोरांनी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे, त्यांच्या नजरेतून बॉलिवूडही सुटलेले नाही..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गुणी अभिनेता राजकुमार राव याचीही अशीच फसवणूक झाल्याचं समोर आलंय. राजकुमारच्या पॅनकार्डचा गैरवापर करून कोणीतरी त्याच्या नावावर कर्जही काढलं. या कर्जाची रक्कम पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल..

Advertisement

याबाबत खुद्द राजकुमार राव यानेच ट्वीट करुन माहिती दिलीय. त्यात तो म्हणतो, की “कुणीतरी माझ्या पॅन कार्डचा (Pan Card) गैरवापर केला. पॅनकार्डच्या आधारे माझ्या नावावर अडीच हजार रुपयांचं कर्ज घेतलंय. त्यामुळे माझा ‘सिबील स्कोअर’ (CIBIL Score) खराब झाला.!

Advertisement

ट्विटमध्ये राजकुमारने ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL)च्या अधिकाऱ्यांना टॅग करीत, “या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी व यापुढे असं होऊ नये म्हणून काळजी घेण्यात यावी..!” असे आवाहन केले आहे. मात्र, त्यावर ‘सिबिल’ अधिकाऱ्यांकडून अद्याप या अभिनेत्याला कोणतेही उत्तर देण्यात आलेली नाही.

राजकुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकुमारने गंमत म्हणून ही पोस्ट केली की काय, असाही सवाल काहींनी केलाय.. तर काही जणांनी आपल्यासोबतही असा प्रकार घडल्याचं म्हटलंय. तसेच काहींनी राजकुमारला यापुढे जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

Advertisement

दरम्यान, राजकुमार राव लवकरच ‘मोनिका, ओह माय डार्लिंग’, ‘भीड’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘हिट’ अशा चित्रपटांत दिसणार आहे. राजकुमार राव ‘बधाई दो’ चित्रपटात शेवटचा दिसला होता.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement