SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दोन्ही डाव जिंकूनही गुजरातचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये ‘त्या’ क्रमांकावर; वाचा, नेमका काय झालाय घोळ

मुंबई :

ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं. केकेआरचा संघही जबरदस्त खेळी करत आहे. या संघानेही 2 डाव जिंकलेले आहेत. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय साकारला होता. हा त्यांचा दुसरा विजय असल्याने त्यांचे चार गुण झाले आहेत. आता वरील तिन्ही संघांचे 4-4 गुण झालेले आहेत. तर दोन्ही डाव खेळून पराभव स्वीकारलेल्या  मुंबई इंडियन्सच्या संघावर नवव्या स्थानावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे.

Advertisement

3 संघाना समान गुण असताना कोण अव्वलस्थानी असणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. पण गुण समान असताना रनरेट सर्वात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. राजस्थान रॉयल्सने यावेळी चार गुण आणि सर्वाधिक रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर केकेआरचा संघ आहे. गुजरातपेक्षा त्यांचा रनरेट हा जास्त असल्यामुळे त्यांनी गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. गुजरातचा संघ यावेळी दोन्ही सामन्यांतील विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.

गुणतालिकेत चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे लखनौ सुपर जायंट्स, आरसीबी आणि पंजाब किंग्स हे संघ आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

Advertisement