पुणे :
अनेकदा आपले असे होते खिशात ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही आपण इकडे तिकडे गाडी घेऊन जात असतो. कुठेतरी लांब-दूर फिरायला निघाल्यावर तर हमखास ड्रायव्हिंग लायसन्स आपण विसरतो आणि मग वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर नाईलाजाने दंड भरावा लागतो. अशात ड्रायव्हिंग लायसन्स सेफ आणि नेहमीच सोबत राहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करुन ठेऊ शकता. Driving License सह इतरही आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्ही फोनमध्ये सेफली सेव्ह करुन ठेऊ शकता.
नव्या कायद्याच्या दुरुस्तीनुसार (मोटार वाहन कायदा 1989) नुसार तुम्ही सोबत आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स बाळगणे, अनिवार्य नाही. mparivahan app नावाचे एक app आहे जे तुम्ही कायमस्वरूपी मोबाईलमध्ये सेव्ह ठेऊ शकता. ज्यात तुमचे सर्व कागदपत्रे सुरक्षित असतील.
अजून एक दुसरा पर्याय म्हणजे DigiLocker app. हे एक असे app आहे, ज्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी सेव्ह करुन ठेऊ शकतात. फोनमध्ये सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स ना चोरी होणार, ना ते कधी खराब होणार. याद्वारे तुम्ही चालानपासूनही वाचू शकता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने DigiLocker अॅप तयार केलं आहे.
DigiLocker वर अकाउंट तयार करणं अतिशय सोपं आहे. हे एक सरकारी अॅप आहे. यावर अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्डद्वारे रजिस्टर करावं लागेल. हे दोन्हीही app पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच हे कायदेशीर रित्या मान्य केलेले आहेत. त्यामुळे यापुढे तुमच्याकडे खिशात ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही चालणार आहे.