SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी आकाशात दिसले आगीचे गोळे, रहस्यमय प्रकाशामुळे नागरिकांमध्ये घबराट..!

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शनिवारची (ता. 2) रात्र काहीसी रहस्यमय ठरली.. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशातून रात्री अचानक आगीची गोळे पडताना दिसून आले.. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह इतर काही जिल्ह्यांत हा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता व घबराट पसरली होती..

नागपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी आकाशात रहस्यमय प्रकाश दिसला. जवळपास पाच ते सात प्रकाशाचे भाग आकाशातून वेगात जाताना दिसले.. नागपूर शहरातील अनेक भागात लोकांनी हा प्रकाश पाहिला. काहींनी त्याचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले. जवळपास 15 सेकंदापर्यंत हा प्रकाश आकाशात दिसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Advertisement

‘नासा’ काय म्हणतेय..?
‘नासा’च्या (NASA) ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’ने (Jet Propulsion Laboratory) पृथ्वीच्या जवळून 2 एप्रिल 2022 रोजी 5 मोठे लघुग्रह जाणार असल्याचे जाहीर केले होते. हे पाच लघुग्रह 18-40 मीटर आकाराचे असल्याचेही सांगण्यात आले होते. नासाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली होती. कदाचित त्याच उपग्रहांचे हे अवशेष असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले..

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदूर, खरगोन, झाबुआ व बरवानी जिल्ह्यातही असेच दृश्य अनेकांनी पाहिल्याचा दावा केलाय. अमेरिकन शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवल (Jonathan McDowell) यांच्या मते हे चीनचे रॉकेट ‘चेंग झेंग 3-बी’ होते. हे रॉकेट गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रक्षेपित केलं होतं. पृथ्वीच्या दिशेने परत येताना, वातावरणाच्या संपर्कात आल्यानं त्याचे भाग जळाले.

Advertisement

नागपुरातील ‘स्कायवॉच ग्रुप’चे चेअरमन सुरेश चोपडे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की “या तेजस्वी उल्का पावसाशी संबंधित असण्याची शक्यता खूप कमी आहे. मला वाटतं, एकतर कुठल्या तरी देशाचा उपग्रह चुकून पडला असावा किंवा काम पूर्ण झाल्यावर जाणूनबुजून क्रॅश केला असावा…!”

उपग्रहाच्या अपघाताची शक्यता
प्रथमदर्शनी समोर आलेल्या व्हिडीओमधून हे उल्कापिंड असल्याचे बोलले जात आहे. नागपूरच्या खगोल तज्ज्ञांच्या मते, कोणत्यातरी उपग्रहाचा अपघात झाला असावा. त्यामुळे हा उल्कापात झाला असावा. अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केल्याने, या प्रकाराचे गुढ आणखी वाढले आहे..

Advertisement

दरम्यान, या घटनेबाबत लोकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं होतं. त्याच वेळी नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्याबाबत उलटसूलट चर्चा सुरु आहेत..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement

 

Advertisement