रस्त्यावर वाहन चालवायचे म्हटलं, तर ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ हवेच.. विना लायसन्स वाहन चालविताना आढळल्यास वाहतूक पोलिस तगडा दंड ठोकतात.. मात्र, आता तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसले, तरी तुम्ही बिनदिक्कत वाहन चालवू शकता.. विशेष म्हणजे, त्यासाठी तुम्हाला वाहतूक पोलिस अडवू शकणार नाहीत. वाचून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय…
गेल्या काही दिवसांपासून रोज पेट्रोलच्या किंमती वाढताहेत.. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झालीय. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांतून प्रदूषणही होत नाही. विशेष म्हणजे, अशा काही इलेक्ट्रिक दुचाकी आहेत, ज्या चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी (व्हेईकल रजिस्ट्रेशन) वा विम्याचीही गरज नसते..
लायसन्स गरज का नाही..?
बाजारात सध्या दोन प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. ‘हाय स्पीड’ नि ‘लो स्पीड स्कूटर’… ज्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 W मोटर, तसेच ‘टॉप-स्पीड’ 25 किलोमीटर प्रति तासांपेक्षा कमी आहे, त्या चालवण्यासाठी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, वाहन नोंदणी (व्हेईकल रजिस्ट्रेशन) व विम्याची गरज लागत नाही. मात्र, ‘हाय-स्पीड’ वाहनांसाठी ही सगळी कागदपत्रे आवश्यक आहेत.
सध्या बाजारात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ची गरज नसलेल्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. कमी किंमतीत चांगली ‘ड्रायव्हिंग रेंज’ देणाऱ्या अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर्सबाबत जाणून घेऊ या…
ओकिनावा लाईट (Okinawa Lite)
– भारतीय स्कूटर मार्केटमधील ‘ओकिनावा’ हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे..
– कंपनीने ओकिनावा लाईट (Okinawa Lite) स्कूटरमध्ये 250-वॅट BLDC इलेक्ट्रिक मोटर व 1.25 kW लिथियम-आयन बॅटरी दिलीय.
– स्कूटरचा टॉप स्पीड प्रति तास 25 किलोमीटर असून, 4 ते 5 तासांच्या चार्जनंतर ही स्कूटर 60 किलोमीटर अंतर कापू शकते.
– स्कूटरमध्ये ऑल-एलईडी हेडलाइट, ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी टेल-लॅम्प व एलईडी इंडिकेटर्स दिले आहेत.
जेमोपाई मिसो (Gemopai Miso)
– भारतात काही दिवसांपूर्वीच ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झालीय.
– कंपनी वेगळी छोटी स्कूटर बनवत असून, त्यात लहान आकाराचा 48 व्होल्ट 1 किलोवॅट लिथियम आयन काढता येण्याजोगा बॅटरी पॅक बसवला आहे.
– स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे.
– स्कूटरच्या पुढे ‘टेलिस्कोपिक सस्पेन्शन’, मागील बाजूस ‘स्प्रिंग लोडेड सस्पेन्शन’ मिळतात.
ईवे एक्सनीया (EeVe Xenia)
– गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईवे कंपनीने ‘एक्सनिया’ (Xenia) मॉडेल बाजारात आणले.
– ली-आयन बॅटरीने चालणारी ही कमी गतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
– स्कूटरमध्ये बॉशची 250W मोटर असून, एका चार्जवर 70 किमीपर्यंत चालते.
– स्कूटरची 140 किलो वजन घेण्याची क्षमता आहे. 4 तासात स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते.
– दोन्ही चाके ट्यूबलेस असून, त्यांना डिस्क ब्रेक आहेत. यूएसबी पोर्ट, एलईडी लाइट्स, कीलेस एंट्री सारखी फीचर्स आहेत.
हिरो फ्लॅश ई-2
– भारतातील सर्वात स्वस्त लिथियम आयन बॅटरी पॅक असणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
– स्कूटरला 250W मोटर, तसेच 48V 28 Ah लिथियम आयन बॅटरी आहे.
– ही स्कूटर कमाल 25 किमी प्रतितास वेगाने धावते.
– पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. एका चार्जवर ती 65 किमी अंतर कापू शकते.
– ‘हिरो’च्या या इलेक्ट्रिक स्कूटरवर 5 वर्षांची वॉरंटी मिळते.
अम्पेरे रिओ इलिट (Ampere Reo Elite)
– होंडा डिओप्रमाणे या स्कूटरला हेडलाइट्स आहेत. त्यात यूएसबी चार्जिंग, एलईडी हेडलाइट, टेललाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट डॅशबोर्ड आहे.
– स्कूटरमध्ये 250W aBLDC हब मोटर आहे. तिचा कमाल वेग 25 किमी प्रतितास आहे.
– एका चार्जवर ही स्कूटर 60 किमी अंतर कापू शकते. स्कूटरमध्ये लिथियम-आयन, लीड-ऍसिड बॅटरी उपलब्ध आहेत.