SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अगदी कमी खर्चात सुरु करा ‘हा’ बिझनेस, वर्षभर कमवाल रग्गड पैसा..!

कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले.. त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकरीची कोणतीही सिक्युरिटी नसल्याचे स्पष्ट झालं.. त्यापेक्षा काहीतरी व्यवसाय केलेला बरा.. असाही विचार अनेकांच्या मनात आला असेल.. अर्थात बिझनेस करायचा म्हणजे, भांडवल आलेच..!

सध्या असेही काही व्यवसाय आहेत, जे अगदी कमी भांडवलात सुरु करता येतात. शिवाय सरकारही तुम्हाला मदतीचा हात देते.. कमी पैशात बिझनेस सुरु करण्याची इच्छा असेल, मेहनतीची तयारी असेल, तर यश हमखास मिळतेच.. चला तर मग आज अशाच एका व्यवसायाबाबत जाणून घेऊ या..!

Advertisement

नवीन बिझनेसबाबत…

अनेकांना सकाळीच हातात नाष्ट्याची प्लेट लागते. नाष्ट्यात अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे, पोहे..! हे एक पौष्टिक अन्न आहे. शिवाय बनवायला नि पचायलाही ते सोपं आहे. त्यामुळेच अलीकडे पोह्यांचे मार्केट झपाट्याने वाढतेय. तुम्हीही ‘पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ सुरु करुन दर महिन्याला रग्गड पैसा कमावू शकता.. कारण, हा बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे.

Advertisement

किती खर्च येतो..?

‘पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्जही मिळते. त्यामुळे सुरुवातीला तुमच्या खिशात फक्त 25,000 रुपये असायला हवेत.. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या प्रकल्प अहवालात याबाबत माहिती देण्यात आलीय..

Advertisement

आवश्यक गोष्टी

  • हे युनिट उभारण्यासाठी साधारण 500 चौरस फूट जागा लागते.
  • पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन नि ड्रमसह लहान वस्तू लागतात.
  • सुरुवातीला काही कच्चा माल आणा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. अनुभवातून व्यवसायही वाढेल.

कसे मिळते कर्ज..?

Advertisement

‘पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ सुरु करण्यासाठी तुम्ही कर्जही मिळवू शकता.. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल. नंतर ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज केल्यावर, तुम्हाला सुमारे 90 टक्के कर्ज मिळते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्याेग आयाेगाकडून दरवर्षी कर्जवाटप केले जाते.

कमाई किती होते..?

Advertisement

खरं तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न.. कोणताही व्यवसाय सुरु करताना, त्यातील नफा-तोटा विचारात घेतला जातो.. हा प्रकल्प सुरू करताना कच्चा माल घेण्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च येईल. इतर गोष्टींसाठी सुमारे 50 हजार रुपये लागतील. सुमारे 8.60 लाख रुपयांत तुम्ही 1000 क्विंटल पोहे तयार करु शकता.

तुम्हाला या 1000 क्विंटल पोह्यातून साधारण 10 लाख रुपयांची कमाई होईल. सगळा खर्च वजा जाता, तुमच्या खिशात जवळपास 1.40 लाख रुपये राहतील. व्यवसाय वाढेल, तसा तुमच्या कमाईचा आकडाही वाढत जाईल.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement