SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हणून WhatsApp ने पुन्हा बॅन केले १० लाख अकाउंट्स; बघा, तुमचेही अकाउंट नाही ना यात?

मुंबई :

WhatsApp सातत्याने आपल्या नवनवीन नियमानुसार कारवाई करत असते. खोटी माहिती पसरवणे, जाहिरातीसाठी अतिवापर करणे, कुणाला त्रास होईल, असे वर्तन करणे, इतर युजरना त्रास देणे, अशा विविध कारणांनी कंपनी लोकांना WhatsApp वापरण्यास मनाई करते आणि अकाउंट बॅन करते. यापूर्वीही व्हॉट्सअॅपने जानेवारीमध्ये १८ लाखांहून अधिक अकाउंट बंद केले आहेत. आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, एक दशलक्षाहून अधिक WhatsApp अकाउंट्स बॅन करण्यात आले आहे. (विशिष्ट 1.4 दशलक्ष).

Advertisement

व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपने ऑक्टोबर २०२१ मध्ये २० लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली होती. व्हॉट्सअॅपचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. मेटा-मालकीच्या अॅपने नवीन IT नियम २०२१ चे पालन करून ऑक्टोबरमध्ये भारतात २० लाख अकाउंट्स बॅन केले होते. व्हॉट्सअॅपने आतापर्यंत २१ कोटींहून अधिक व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन केले आहेत.

का केले जाते बॅन :-

Advertisement

जर कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, धमकावणारे, त्रास देणारे आणि द्वेष करणारे भाषण, जातीय किंवा वांशिक भेदभाव असणारे मेसेज शेयर करत असेल असेल किंवा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अनुचित कंटेंटला प्रोत्साहन देत असेल, तर त्याच्या अकाउंटवर बंदी घातली जाते. याशिवाय, जर एखाद्या युजरने WhatsApp च्या नियम आणि नियमांचे उल्लंघन केले तरी त्याचे अकाउंट बंद केले जाते.

Advertisement