SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.अनेक कामांत अडथळा निर्माण होईल, मन स्थिर ठेवा. व्यापारात समृद्धी मिळेल. उत्पन्न वाढेल. ‘ऐकावे जनाचे ‘करावे मनाचे’ असे धोरण ठेवा. भाग्याची साथ राहील. तुमचे महत्त्व वाढेल. तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ (Taurus): झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार यातून चांगली कमाई होईल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.समाजसेवेत मन लागेल. व्यापारात यश मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. नावलौकिक वाढेल. आर्थिक बाजू चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. कौटुंबिक मतभेद होतील. खाण्या पिण्याचे तंत्र सांभाळा.

Advertisement

मिथुन (Gemini) : आज प्रकृतीच्या थोड्या तक्रारी जाणवतील. वाहन, कुठलेही यंत्र चालवताना काळजी घ्यावी, महिलांनी विशेष काळजी घ्यावी. उत्पन्न स्थिर राहील. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता. मोठे संकट उभे होऊ शकते. कुटुंबीयांचे सहकार्य मिळू शकते. अडचणी कमी होतील. मात्र, थोडा तणाव राहील. तणावाचे व्यवस्थापन नीट केले पाहिजे.

कर्क (Cancer) : मनमोकळे वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्व‍च्छंदीपणे वागण्यावर भर द्याल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरात पाहुणे येतील. मोठे नियोजन करण्याची वेळ येऊ शकते. मनात सकारात्मक आणि आनंदी विचार असतील तरच यशाचा आनंद लुटता येतो, हे लक्षात घ्या.

Advertisement

सिंह (Leo) : स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल. शारिरीक कष्ट वाढण्याची शक्यता. प्रवास करण्याची वेळ येईल. गुंतवणूक यशस्वी होण्याची शक्यता. दूरच्या प्रवासाचा योग, रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या मताचा आदर करा. परीक्षेत यश मिळेल.

कन्या (Virgo) : घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा. जोडीदारासोबत मतभेद होतील. बेरोजगारी दूर होईल. नोकरीर प्रशंसा होईल. जोडीदाराची साथ मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाने वागण्याची गरज आहे.

Advertisement

तुळ (Libra) : चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करणे टाळा. प्रवासात सावधानता बाळगा. सामान, कागदपत्रे सांभाळून ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे करू नका. मुलांना यश मिळेल.

वृश्‍चिक (Scorpio) : आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरीत यश मिळेल, प्रसन्न वातावरण राहील. अनपेक्षित लाभ होईल. काही अडचणी येतील. मात्र, आपण त्यातून मार्ग काढाल. जीवनसाथी चांगली साथ देईल. स्थावरच्या कामात यश येईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. कौटुंबिक सोहळ्यात उपस्थिती लाभेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक आवक चांगली राहील.

मकर (Capricorn) : घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल.जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. दगदग कमी होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. भाग्याची साथ मिळेल. अडचणी दूर होतील.

Advertisement

कुंभ (Aquarious) : मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगीभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.धार्मिक कार्यात मग्न रहाल. जोडीदाराकडून प्रेम मिळल. चांगल्या लोकांचे मार्गदर्शन होईल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अधिकार वाढवून मिळतील. व्यवसायात धाडसी निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या.

मीन (Pisces) : हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल. अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता. आरोग्य ढासळण्याची शक्यता. उत्पन्न स्थिर राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीचा व्यवहार सांभाळून करा. एखाद्या कामात दिरंगाई होईल. काही अडचणी येतील. त्यामुळे दगदग होईल. मनस्ताप सहन करावा लागेल.

Advertisement