SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो! निकालाबाबत मोठी बातमी आली समोर..

राज्यातील दहावी-बारावीचे पेपर तपासणी कधी यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या संघटनांनी दहावी बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासणार नाही, असा विरोध करत आक्रमक पावित्रा घेतला होता. यामुळे निकालाबाबत मोठा संभ्रम विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झाला होता.

गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शाळा सुरु असताना आता कुठेतरी ऑफलाईन शाळा सुरु होणार आहेत यादरम्यान दहावी आणि बारावी परीक्षांचे पेपर तपासणीसाठी राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांकडे जात असतात. पण यंदा पेपर तपासणीस अशा शिक्षकांच्या संघटनांनी केलेल्या या विरोधामुळे आता महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाचा काय? निकाल यंदा वेळेत लागणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे. आता यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.

Advertisement

पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष (Sharad Gosavi) म्हणाले, “दहावी, बारावीचे निकाल हे वेळेतच लावण्यात येतील. काही दिवसांपूर्वी राज्यातील विना अनुदानित शिक्षक संघटनेने दहावी-बारावीचे पेपर तपासायला विरोध केला आहे. पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या विभागाकडून आलेले निवेदन राज्य सरकारला पाठवले आहेत. आपल्या मागण्या मान्य होतील मात्र विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरू नये”, असे आव्हानही त्यांनी केलंय.

पुढे ते म्हणाले, “विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सरकार याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल. तसेच याशिवाय जर विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासायला नकार दिला तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करू. मात्र 10 वी, 12वी चे निकाल वेळेतच लागतील, असा ठाम विश्वास आहे, असेही गोसावी म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement