SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुरणपोळीवर आडवा हात मारून झोपायचा विचार करताय? थांबा, दुपारी जेवल्यावर झोपलात तर भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम

सकाळी सकाळी गुढी उभारल्यावर आता दुपारच्या वेळी अनेकांनी पुरणपोळी-गुळवणी वर आडवा हात मारला असेल. त्यात जेवणाच्या शेवटी आमटी-भाताचा फुरकाही असेलच जोडीला… एकूण असं अन्न सेवन केल्यावर एकदम गाढ झोप म्हणजे खरं सुख… असं आपल्याला वाटतं.

सध्याचा तरुणाईला दुपारच्या झोपायची सवय आहे. यामुळे आपल्याला लगेचच जाणवणारी एकच समस्या उदभवते, ती म्हणजे रात्रीची झोप लागत नाही.

Advertisement

आता रात्रीची झोप लागत नाही म्हणजेच आपोआप जागरण होते. मग शरीरातील उष्णता वाढते, ऍसिडिटीचा त्रास होतो. पण ही दुपारची झोप फक्त एवढाच परिणाम करत नाही. तर आपल्या आयुष्याला कायमस्वरूपी दुष्परिणाम करतील, अशा व्याधी जडावते. दुपारी झोपायची ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी.

दुपारच्या झोपेमुळे होते हे शारीरिक नुकसान :-

Advertisement

1) पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

2) दुपारच्या झोपेमुळे शरीरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. परिणामी वजन वाढते. वजन वाढल्याने साखर, रक्तदाब असे त्रास जडू शकतात.

Advertisement

3)  दुपारी झोपेमुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात.

Advertisement