SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजनेच्या नियमात महत्वाचा बदल, महाराष्ट्रातील 21 लाख शेतकरी योजनेपासून वंचित राहणार..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना… देशातील गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 2019 मध्ये ही योजना सुरु केली.. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये, असे तीन हफ्त्यामध्ये हे पैसे मिळतात..

देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यात एकट्या महाराष्ट्रातील 1 कोटी 9 लाख 33 हजार 298 शेतकऱ्यांचा समावेश आहे..

Advertisement

दरम्यान, मधल्या काळात या योजनेतही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.. अनेक अपात्र लोकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले.. अशा बनावट, अपात्र शेतकऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगाही उगारला.. या लोकांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे..

पीएम किसान सन्मान निधी योजनेत पारदर्शकता यावी, गैरव्यवहारांना आळा बसावा, यासाठी मोदी सरकारने या योजनेत आमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे आता खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.. सरकारने नियमांत केलेले बदल जाणून घेऊ या..

Advertisement

 योजनेत कोणते बदल झाले..?

  • पीएम किसान योजनेसाठी आता पात्र शेतकर्‍यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. तसेच, शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्यांच्या बँक खात्याशी संलग्न असणं अनिवार्य असेल..
  • आधार प्रमाणीकरण केलेले नसेल, तसेच बँक खात्याशी आधारकार्ड संलग्न केलेले नसेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • मोदी सरकारच्या नव्या निकषानुसार पीएम किसान योजनेसाठी आधार प्रमाणीकरण केलेले असले, तरी बँक खात्यालाही आधार कार्ड संलग्न असणं अनिवार्य आहे.

21 लाख शेतकरी वंचित राहणार

Advertisement

महाराष्ट्रातील सुमारे 21 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, तसेच आधार कार्ड हे बँक खात्याला जोडलेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड न दिल्याने आधार प्रमाणीकरण झालेले नाही. काहींच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आहेत..

योजनेचा 11वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, मात्र बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसल्यास हा हप्ता मिळणार नाही.. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी तातडीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाऊन आधार कार्ड संलग्न करणं महत्त्वाचं आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement