SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोस्टाची लखपती बनवणारी योजना; रोज गुंतवा 100 रुपये आणि मिळवा 14 लाख, वाचा संपूर्ण योजना एका क्लिकवर

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या अत्यंत फायदेशीर असतात. या योजनांचा फायदा म्हणजे अगदी कमी पैशात या योजना सुरु होतात. तसेच या योजना सरकारी असल्याने आपले पैसे 100% सुरक्षित असल्याची हमी आपल्याला असते. याही पुढे जाऊन चांगला व्याजदर आपल्याला मिळत असतो. आज आपण अशाच एका लखपती बनवणाऱ्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत.

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना असे या योजनेचे नाव असून ही योजना विशेषत: ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. या योजनेत भारतात राहणार कुठलाही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.

Advertisement

काय आहे योजना :-

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी 7 लाखांच्या गुंतवणुकीसह 20 वर्षांसाठी ही पॉलिसी खरेदी केली, तर त्याला दररोज 95 रुपये म्हणजेच हप्ता म्हणून दरमहा 2850 रुपये द्यावे लागतील. तीन महिन्यांसाठी हप्ते भरल्यास, तुम्हाला 8850 रुपये आणि 6 महिन्यांसाठी तुम्हाला 17100 रुपये भरावे लागतील. यानंतर, तुम्हाला मॅच्युरिटीवर म्हणजेच 20 वर्षे पूर्ण झाल्यावर सुमारे 14 लाख रुपये मिळू शकतात.

Advertisement

काय आहेत फायदे :-

या पॉलिसी अंतर्गत, तुम्हाला 10 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. त्याच वेळी, पॉलिसी दरम्यान व्यक्तीला जिवंतपणी 15 वर्षांमध्ये 6 वर्ष, 9 वर्ष आणि 12 वर्षांमध्ये 20 टक्के पर्यंत पैसे परत दिले जातात. मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित रकमेपैकी 40 टक्के रक्कम देखील तुम्हाला परत दिली जाते.

Advertisement