SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

6 GB रॅम आणि भन्नाट कॅमेरा असणारा जगात भारी मोबाईल मिळतोय एवढा ‘स्वस्त’; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मुंबई :

Redmi, Realme, Samsung, Infinix, Tecno आणि Vivo या आणि अशा मोबाईल तसेच टेलीकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. कुणी भारी मोबाईल आणत आहे तर कुणी भारी कॅमेरा तर कुणी स्वस्तात मस्त असं काहीतरी देऊन मार्केट हलवायचा प्रयत्न करत आहे. असाच एक जबरदस्त स्मार्टफोन मार्केटमध्ये आलेला आहे. Mircomax कंपनीचा हा Mircomax In 2B फोन असून याची किंमत 10 हजार रुपयांच्या आत आहे.

Advertisement

हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 9499 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनला बॅटरी बॅकअप पण चांगला दिला आहे. 5000 mAh ची बॅटरी असून बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या Mircomax In 2B च्या ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये  प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल तर 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे. 6 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजसह हा मोबाईल आपल्याला अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. या किमतीत, रेंजमध्ये दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा मोबाईल मिळणार नाही. स्वस्तात मस्त फीचर्स देण्याची ही कमाल Mircomax कंपनीने केलेली आहे.

अजून एक भारी Redmi कंपनीचा Redmi 9 active हा फोन कमी किमतीत तगडे फीचर्स देणारा आहे. या स्मार्टफोनमध्ये मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. जो 13 + 2 MP आहे. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 720 × 1600 पिक्सेल आहे. यात 5000 mAh बॅटरी असून याची किंमत 11499 रुपये आहे.

Advertisement