SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मलायका अरोराच्या गाडीची मनसे कार्यकर्त्याच्या गाडीला जोराची धडक; तरीही ‘मनसे’ने केले हे कौतुकास्पद काम

मुंबई :

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे यांचा मेळावा दरवर्षी मुंबई येथे होतो. कोरोनामुळे या मेळाव्याला 2 वर्षे खंड पडला होता. नेहमीप्रमाणे या सोहळ्याला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक जमतात. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीला पनवेल जवळ अपघात झाला. मलायकाच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना मलायकाच्या गाडीने धडक दिली.

Advertisement

या घटनेत मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. मनसे सैनिकांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.  अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करत उपचाराची सोय करुनच मनसे सैनिक मुंबईकडे रवाना झाले.

मनसे कोल्हापूरचे संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांनी मलायकाला रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी दिली. जयराज लांडगे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून मुंबईकडे आम्ही निघालो असताना पनवेलनजीक मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील ड्रायव्हरचा ताबा सुटून मनसेच्या तीन गाड्यांना मलायका यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

Advertisement

स्वत:च्या गाडीला धडक बसूनही समोरच्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्याची जबाबदारी घेतल्यामुळे मनसे सैनिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement