SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

त्याठिकाणी भेदभाव होतो म्हणून मतभेद… ; अजितदादांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मांडला ‘तो’ विषय

मुंबई :

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या कायमच समोर येत असतात. अगदी गेल्या 2 दिवसांपासून गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन करत ‘आम्ही सर्वजण एकत्र’ असल्याचे सांगितले. तसेच आपला सहकारी मंत्र्यांवर विश्वास असल्याचेही सांगितले. मात्र अजित पवारांनी खरी गोम ओळखत एक मुद्दा उपस्थित केला.

Advertisement

मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येतात. मात्र आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेदाच्या बातम्या येतात. त्यामुळे तुम्हीच काय ते खरं सांगा, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उपरोधिक वक्तव्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेद असल्याच्या बातम्या येत असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement

योग्य वेळी आल्यावर योग्य गोष्टी बोलणे, यात पवार कुटुंबाचा हातखंडा आहे. मागेही एकदा तीनचाकीची स्टियरिंग आपल्याच हातात असल्याचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना अजितदादांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आताही अगदी त्याच पद्धतीने गमतीशीर विधान करत दादांनी आपली भूमिका लोकांपर्यंत आणि मुख्यमंत्री ठाकरेंपर्यंत पोहोचवली.

Advertisement