SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चरणी ठेवतो माथा: महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांसाठी ‘ते’ मंदिर झाले पूर्णपणे खुले, वाचा, आनंदाची बातमी एका क्लिकवर

पंढरपूर :

कोरोनामुळे आणल्या गेलेल्या निर्बंधातून आता वारकरी, शेतकरी आणि तमाम वैष्णवजन सगळे मुक्त होणार आहेत आणि थेट विठुरायाच्या चरणी माथा टेकवू शकणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्याचे दरवाजे आता आपणा सर्वांसाठी खुले होणार आहेत. 2 वर्षांपासून भक्तांमध्ये आणि विठूरायात पडलेलं हे अंतर आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्णपणे संपणार आहे. भाविक आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे. या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे.

Advertisement

महाविकास आघाडी सरकारने वारकरी मंडळी तसेच लाखो विठूरायाच्या भाविक भक्तांना निर्बंध मुक्तीची मोठी भेट दिल्याने आज सकाळी सहापासून विठ्ठल भक्तांना आपले मस्तक थेट विठुरायाच्या चरणावर ठेऊन दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. आजच्या निर्बंधमुक्तीमध्ये आता मंदिरात देवाला प्रिय असणारा तुळशी हार आणि प्रसाद देखील नेता येत असल्याने शेकडो लहान व्यापाऱ्यांची उपासमार बंद झाली आहे.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी… असे म्हणत विठुरायाचे मनमोहक दर्शन आता होणार आहे. अनेक दिवसांपासून विठूरायाची पंढरी खुली करा, अशी मागणी होत होती. अखेर आज ती मागणी पूर्ण होताना दिसत आहे. आज विठुरायाचे मंदिरसुद्धा आकर्षक बनवले आहे. विठ्ठल गाभारा , रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळाखांबी या ठिकाणी झेंडू , जरबेरा , शेवंती , गुलछडी , ऑर्किड , ग्लायोऊड , गुलाब , तगर अशा विविध रंगी सुगंधी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत 1100 किलो फळे आणि 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. आज गुढी पाडव्याला या प्रसन्न वातावरणात भाविकांना विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवण्याचा आनंद घेता येत आहे.

Advertisement

 

Advertisement