SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला.. करोडपती होण्यासाठी ‘असं’ करा रजिस्ट्रेशन..!

‘कौन बनेगा करोडपती..’ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो.. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोच आहे, शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला चालना देतोय.. बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यामुळे या ‘शो’ला चार चाॅंद लागले..  बच्चन यांचे भारदास्त आवाजातील सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावले..

‘केबीसी’ नि अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. लवकरच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा नवा सीजन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.. ‘केबीसी’च्या 14 व्या सीजनसह, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहेत.

Advertisement

दरम्यान, ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ने शनिवारी (ता. 2) ‘केबीसी’च्या नव्या सीजनचा पहिला ‘प्रोमो’ रिलीज केला. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. ‘स्वप्ने फक्त बघायची नसतात, तर आता ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे..’ असं अमिताभ बच्चन हे या प्रोमाेमध्ये म्हणताना दिसतात..

प्रोमोमध्ये नेमकं काय..?

Advertisement

‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ने रिलिज केलेल्या ‘केबीसी’च्या या प्रोमोमध्ये एक तरुण जोडपे दिसते. त्यात पती आपल्या पत्नीला सांगतो, की मोठं घर बांधू, मुलांना चांगलं शिक्षण देऊ नि कधीतरी दोघे जोडीने स्वित्झर्लंडला जाऊ… कुटुंबासाठी स्वप्ने पाहणाऱ्या पतीला पाहून पत्नी आनंदी होते.

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

Advertisement

मध्ये बरीच वर्षे उलटून जातात.. हे पती-पत्नी वृद्ध होतात. मात्र, पती अजूनही त्याच स्वप्नांबद्दल, त्याच घराच्या छतावर आपल्या पत्नीशी बोलत असतो. मात्र, यावेळी नवऱ्याचं हे बोलणं ऐकून पत्नी रागावते. कारण, कित्येक वर्ष झाली, तरी ते फक्त स्वप्नातच जगत आहेत..’ त्यावेळी अमिताभ बच्चन म्हणतात, ‘असं स्वप्नात जगू नका…, फोन उचला आणि आपली स्वप्ने पूर्ण करा…!’

Advertisement

केबीसी-14 च्या या पहिल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना आगामी ‘कौन बनेगा करोडपती’च्या नोंदणीबाबत आवाहन करतात. दरम्यान, ‘केबीसी’मध्ये सहभागी होण्यासाठी 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. तुम्हीही 9 एप्रिलपासून काही प्रश्नांची उत्तरे देऊन ‘केबीसी’मध्ये भाग घेऊ शकता.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement