SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीच्या ‘त्या’ वागण्यावर जडेजा संतापला; बघा, नेमकं काय खटकलं जडेजाला?

मुंबई :

चेन्नईचा संघ (CSK) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. गुरुवारी झालेल्या सातव्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. लखनौचा या हंगामातील हा पहिलाच विजय आहे. याआधी पहिल्या लढतीत त्यांचा परभव झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी शानदार कामगिरी केली. तर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.

Advertisement

चेन्नईच्या पराभवाला अनेकजण रवींद्र जडेजाला जबबादार धरत असून त्याला ट्रोल करण्यात येतंय. दरम्यान याबाबत आता माजी क्रिकेटर अजय जडेजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नईच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंनी महेंद्र सिंह धोनीवर जोरदार हल्ला चढवला. आयपीएल २०२२ला सुरूवात होण्याआधी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. चेन्नईचे नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आले. पण गुरुवारच्या सामन्यात मैदानात धोनीच नेतृत्व करताना दिसत होता. असे वाटत होते की जडेजा फक्त कागदावर कर्णधार आहे. सामन्यातील हा प्रकार अनेक माजी क्रिकेटपटूंना आणि चाहत्यांना देखील आवडला नाही.

कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही अजय जडेजाला धोनीची निर्णयक्षमता आवडली नाही. अजय जडेजा सामन्यानंतर म्हणाला, ‘कधी कधी तुम्ही कमांड हातात घेता मी समजू शकतो. मी जडेजाची बाजू घेत नाही. पण जडेजा बाऊंड्रीजवळ उभा राहिला आणि धोनी सगळा खेळ चालवत राहिला. तो खूप मोठा खेळाडू आहे, असं बोलणं मला आवडत नाही, पण या सामन्यात जे काही झाले ते मला आवडले नाही. हे चुकीचं आहे, यात काही शंका नाही. माझ्यापेक्षा मोठा धोनीचा कोणी चाहता नाही. जर त्याने असं शेवटच्या सामन्यात हे केलं असतं तर समजण्यासारखं होतं.

Advertisement

नेमका कुठे चुकला धोनी :-

माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १९वे षटक शिवब दुबेला देण्याचा निर्णय घेता. या षटकात २ षटकार आणि २ चौकारांसह एकूण २५ धावा केल्या. एविन लुईस आणि आयुष बदोनी यांनी एका षटकात सामन्याचे चित्र पालटले. तोपर्यंत लढत चेन्नईच्या बाजूने झुकली होती. यामुळे अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी ९ धावांचे टार्गेट शिल्लक राहिले. २०व्या षटकात आयुषने मुकेश चौधरीला षटकार मारून विजय निश्चित केला. धोनीचा दुबेला ओव्हर देण्याचा एक निर्णय चुकीचा ठरला.

Advertisement