SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

साडे दहा वर्षांत पैसा डबल..! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मिळतो जबरदस्त परतावा..!

नवीन आर्थिक वर्षाला शुक्रवारपासून (ता. 1) सुरुवात झाली.. या नवीन आर्थिक वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक जण विविध योजनांमध्ये पैसा गुंतवत असतात. मात्र, अशी गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे असते..

सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे, एफडी.. अर्थात फिक्स डिपाॅझिट किंवा ठेवी.. मात्र, गेल्या काही दिवसांत ठेवीवरील व्याजदरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.. त्यामुळे त्यातील गुंतवणूक सुरक्षित असली, तरी त्यातून फारसा परतावा मिळत नाही.. अशा वेळी पोस्टाच्या बचत योजना फायदेशीर ठरतात. अशाच एका योजनेबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

सध्याच्या काळात बचत योजनांसाठी पोस्ट विभाग सर्वात उत्तम पर्याय आहे. जोखीममुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, पोस्टाच्या एका योजनेची चांगली चर्चा आहे.. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) असे या योजनेचे नाव.. या योजनेतून चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय कर सवलतीचाही लाभ घेता येतो..

‘एनएससी’ योजनेचे फायदे

Advertisement

– पोस्टाच्या ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट’ योजनेत गुंतवणूकदाराला 6.8 टक्के व्याज मिळते. या योजनेत किमान 1000 रुपयांपासून 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. मात्र, या योजनेत फक्त 100 च्या पटीतच गुंतवणूक करता येते.

– नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये जर तुम्ही 5 वर्षांसाठी एकूण 1000 रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 1389 रुपये मिळतात. मात्र, 10 वर्षे आणि 6 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास 6.8 टक्के वार्षिक व्याजाने दुप्पट पैसे मिळतात.

Advertisement

– पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदारांना आयकराच्या कलम 80 (सी) अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा परतावा मिळेल. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही पाच वर्षापूर्वी हे पैसे काढू शकत नाही. शिवाय योजनेत करबचतीचाही लाभ मिळतो..

कोण गुंतवणूक करु शकतो..?

Advertisement
  • योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 10 वर्षे असणं आवश्यक आहे.
  • तुम्ही जॉईंट किंवा सिंगल, कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करू शकता.
  • 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे खाते उघडल्यानंतर, पालकांकडून त्यावर नजर ठेवली जाते.
  • 10 ते 18 वर्षांचे मूल असताना खाते अल्पवयीन स्वरूपात असेल.
  • 18 वर्षांनंतर खाते प्रौढ खात्यात रूपांतरित केले जाते.
  • या योजनेअंतर्गत तीन लोकांच्या नावानेही संयुक्त खाते उघडता येते.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement