SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ शेती करा आणि कमवा लाखो रुपये, सरकार देतंय 30% अनुदान..

देशातील शेतकरी आता आधुनिकतेची जोड देऊन शेती करू लागले आहेत. आता मोबाईलमुळे क्षणातच सर्व माहिती मिळून जाते. म्हणून आता शेतीला जोडधंधा म्हणून तुम्ही व्यवसाय देखील करू शकता. आधुनिक युगात तुम्ही पारंपरिक शेती व्यतिरिक्त आरोग्याच्यादृष्टीने सुद्धा शेती करू शकता.

बाजारपेठेत जास्तीत जास्त आता आरोग्यासाठी जे चांगले पदार्थ आहेत त्याला नागरिकांची मागणी आहे. तुम्ही या शेतीमधून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला तमालपत्राच्या व्यवसायाबद्दल माहीती देणार आहोत. इंग्रजी मध्ये बे लिफ असे तमालपत्रला म्हटले जाते. पदार्थांची चव वाढवण्यासाठी तमालपत्र चा वापर हा आपल्याकडे केला जातो.

Advertisement

तमालपत्राची शेती:

तमालपत्राच्या रोपांमध्ये 4 ते 6 मीटर अंतर ठेवून ते लावावे. यानंतर जसे जसे तमालपत्र चे झाड वाढत जाईल तसे तसे तुमच्या उत्पनामध्ये वाढ होत जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, तमालपत्र ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ 30 टक्के अनुदान देते. तमालपत्राच्या लागवडीसाठी एकूण खर्चाच्या 30 टक्के हे अनुदान मिळू शकते.

Advertisement

भारत, फ्रान्स, रशिया, अमेरिका, इटली, उत्तर अमेरिका तसेच बेल्जियम या देशांमध्ये तमालपत्राचे जास्त उत्पादन घेतात. हे तमालपत्र सूप, मांस, सीफूड आणि भाजीपाला (भाज्या) वापरले जाते. तमालपत्र एक प्रमुख मसाला पदार्थ असल्याने याची बारा महिने मागणी असते.

उत्पन्न किती येणार ?

Advertisement

जर एक तमालपत्राचे झाड असेल तर त्या एका झाडातून तुम्ही प्रति वर्ष 5 हजार रुपयांपर्यंत पैसे येऊ शकतात. जर तुमच्याकडे 25 तमालपत्र ची झाडे असतील तर त्यामधून वर्षाला तुम्ही अंदाजे 75 हजार ते 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक उत्पन्न काढू शकता. जर तुम्हाला नफा अधिक मिळवायचा असेल तर योग्य ते मार्गदर्शन घेणेदेखील गरजेचं आहे आणि योजनेविषयी कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालयात जाऊन माहीती घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement