SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात विकले जाणार ‘एवढे’ टन सोने; वाचा, काय असेल भाव आणि किती कोटी रुपयांची होणार उलाढाल

मुंबई :

करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या सराफांसाठी यंदाचे भारतीय नववर्ष विक्रम संवत २०७९ अर्थात गुढीपाडवा सकारात्मक जाणार आहे. गुढीपाडव्याला सोनेखरेदी केली जाते. यंदा हा सण शनिवारी आल्यामुळे प्रत्यक्ष दालनात येऊन सोने खरेदी करण्याचे प्रमाण मोठे असणार आहे.

Advertisement

सराफ बाजारही सज्ज झाला असून शनिवारी मुहूर्तावर मुंबईसह महाराष्ट्रातील सराफ बाजारात500 कोटींची सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. एकट्या मुंबईत 300 कोटींच्या आसपास उलाढाल होऊ शकते. सोन्याचा भाव 51 ते 52 हजार रुपये प्रति तोळा असू शकेल.  केंद्र सरकारकडूनही निर्बंध काढून घेण्यात आल्याने आनंदाचे वातावरण आहे. गुडीपाडव्याच्या दिवशी दागिन्यांचे बुकिंग ३० ते ४० टक्के होईल.

येणारा लग्नसराईचा हंगाम आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेतील सकारात्मक वातावरम यामुळे दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा सराफ व्यावसायिकांना आहे. तीन वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपये होता, तो शुक्रवारी ५२ हजार रुपयांवर गेला. प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चढ्या भावाने विकले जाईल, असा सराफांचा अंदाज आहे.

Advertisement

दोन वर्षांपासूनच्या कोरोना निर्बंधांतून आता सुटका झाल्याने सण-उत्सव आणि समारंभ धडाक्यात साजरे होतील. याचा फायदा म्हणून पुन्हा सराफ बाजार उसळी घेईल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्तरावर 45 टन सोने विकले जाईल.

Advertisement