SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आणि ‘ते’ मराठी भाजप खासदारच म्हणाले… देशातील महागाई कमी होवो, याच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

दिल्ली :

मराठी माणूस जगात कुठेही गेला तरीही आपला मूळ स्वभाव काही सोडत नाही. आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणारे टिपिकल पुणेरी नेते व खासदार गिरीश बापट यांनी जरा हटके गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Advertisement

बापट यांनी शुभेच्छा देताना असे म्हटले की, आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा करत आहे. आज खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे की, सध्या देशाची परिस्थिती, आता देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत.

gas, पेट्रोल, डीझेल, दुध, तेल आणि ईतर जीवनावश्यक वस्तू्सुद्धा मोठ्या प्रमाणात महाग होत असताना भाजप खासदाराने अशा शुभेच्छा दिल्याने बापट हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. देशात महागाईने सर्व सामान्याचे कंबरडे मोडले आहे आणि अशाच वेळी भाजप नेतेच महागाई कमी व्हावी, यासाठी शुभेच्छा देट आहेत, हाच सगळ्यात मोठा विरोधभास आहे.

Advertisement

शुभेच्छा देताना पुढे बापट यांनी असे म्हटले की, मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणाऱ्या भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते. गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असते. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे. बापट यांचे विधान गांभीर्याने घ्यायचे की गमतीने हा प्रश्न असला तरी त्यांनी मांडलेला मुद्दा मात्र रास्तच आहे.

Advertisement