SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाबो… फक्त 1 रुपयात मिळताहेत ‘या’ वस्तू; Amazon ने दिलीय मोठी संधी

मुंबई :

घरबसल्या तुम्ही विविध गोष्टी खरेदी करू शकता तेही अवघ्या  एक रुपयात… असे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसला नसेल. पण हे खरंच आहे. आता Amazon वर एक भारी आणि जबरदस्त सेल सुरु झालेला आहे. या सेलच्या माध्यमातून आता आपण अवघ्या 1 रुपयात विविध वस्तू खरेदी करू शकणार आहात. Amazon च्या Super Value Days  असे या सेल चे नाव असून आता आपण या सेल मध्ये जबरदस्त सुट मिळवून खरेदी करू शकता. या सेल दरम्यान घरात उपयोगी येणाऱ्या अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. प्राइम मेंबर्स सेलमध्ये स्वस्तात वस्तू खरेदी करू शकतात.

Advertisement

आजपासून म्हणजेच 1 एप्रिल ते 7 एप्रिल असा आठवडाभर हा सेल चालणार आहे.  या सेलचे वैशिष्ट्ये म्हणजे या अंतर्गत कंपनी प्राइम मेंबर्सला 1 रुपयात ग्रोसरी डील्स देत आहे. Kellogg, Mother Dairy, Cadbury, Daawat अशा विविध आणि लोकप्रिय ब्रँड्सची उत्पादने तुम्ही खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता.  Amazon Super Value Days सेलमध्ये ग्राहकांना SBI Credit Card आणि Credit EMI चा वापर केल्यास 1 ते 3 एप्रिलपर्यंत 10% अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. तर 4 ते 7 एप्रिल 2022 दरम्यान ICICI Credit Card यूजर्सला अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल.

 

Advertisement

या सेलमध्ये 1 रुपयात डील दिली जात आहे. ग्राहकांना 500 ग्रॅम बटाटा केवळ 1 रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय, सेलमध्ये अर्धा केला कांदा केवळ 1 रुपयात मिळत आहे. कांदा व बटाट्याशिवाय बासमती तांदळावर देखील डिस्काउंट मिळत आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टीसोबतच हाउसहोल्ड आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्सवर देखील डिस्काउंट दिले जात आहे. सेलमध्ये तुम्ही बॉडी वॉश, हँड वॉश, फ्लोर क्लिनरला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. सेलमध्ये आंबे देखील डिस्काउंटसह उपलब्ध आहेत.

Advertisement