SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 2 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ GST: देशात मार्चमध्ये विक्रमी 1.42 लाख कोटी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा वाटा 2 लाख 17 हजार कोटी एवढा

✒️ युक्रेन-रशिया युध्‍द: आता युक्रेनचा रशियातील तेल डेपोवर हल्ला – रशियाचा दावा, दुसऱ्या महायुद्धानंतर रशियावर हवाई हल्ला करण्याची युक्रेनची ही पहिलीच वेळ

Advertisement

✒️ मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू, शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
झाल्याची माहीती

✒️ पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकात्याने 6 गडी राखून केले पूर्ण, रसेलची 31 चेंडूत वादळी 70 धावांची खेळी, उमेश यादवचे 4 बळी

Advertisement

✒️ उबरसारख्या मोबाईल ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांनी आपल्या दरात वाढ करण्याचा घेतला निर्णय, इंधन दरवाढीमुळे उबर 15 टक्के दरवाढ करणार

✒️ शेतकऱ्यांकडे, सामान्यांकडे क्षुल्लक कर्जफेडीसाठी तगादा लावणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानींचे 12 हजार कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ केलं असल्याची माहीती

Advertisement

✒️ ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या मंचावर निवेदिता सराफनंतर आता मराठी सिने-सृष्टीतील अभिनेते अशोक सराफ हजेरी लावणार, वाढवणार स्पर्धकांचा उत्साह

✒️ गेल्या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सच्या विक्रीत 67% वाढ, मारुतीची दुप्पट निर्यात, महिंद्रा अँड महिंद्राच्या कारच्या विक्रीत गेल्या महिन्यात 65% वाढ

Advertisement

✒️ दक्षिण कोरियामध्ये सचियोन शहरातील डोंगराळ क्षेत्रात दोन विमानांची काल हवेत झाली टक्कर; 3 जणांचा मृत्यू, एक जण जखमी

✒️ फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2022 सोहळा नुकताच मुंबईत पडला पार; सर्वोत्कृष्ट चित्रपट – झिम्मा आणि कारखानीसांची वारी (विभागून)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement