SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुढीपाडव्याचा मुहूर्त कधी..? कशी उभारायची गुढी, जाणून घ्या शास्रोक्त माहिती..!

आज गुढीपाडवा.. साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त… नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला दिवस.. नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस शुभ मानला जातो. घरोघर गुढी उभारुन या दिवशी नव्या कामाची सुरुवात केली जाते…

चैत्र महिन्यात सूर्य ‘मेष’ राशीत प्रवेश करतो, म्हणून हा मराठी वर्षातील पहिला महिना आहे. पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात ‘चंद्र’ असतो, त्यामुळे या नक्षत्रावरून या महिन्याला ‘चैत्र’ नाव पडले. चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. खगोलीय गणितानुसारही या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

Advertisement

गुढीपाडव्याचा मुहूर्त

महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 एप्रिलला सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी फाल्गुन अमावास्या संपली. त्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात झाली असून, 2 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी ‘अमृत सिद्धी योग’ आणि ‘सर्वार्थ सिद्धी योग’ तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ व फलदायी मानले जातात.

Advertisement

कशी उभाराल गुढी..?

गुढी उभारण्यासाठी काठी स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून, त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.

Advertisement

अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी. हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने, या गुढीलाच ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हटले जाते. त्यामुळेच ‘ब्रह्मध्वजा’ची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु।।

Advertisement

ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाच्या पाण्याचे सेवन करावे.. नंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना, पीकपाण्याची माहिती घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement

 

Advertisement