SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कडक उन्हाळा : नक्कीच घ्या ‘ही’ काळजी; नाहीतर पडेल महागात

उन्हात काम करणाऱ्या किंवा फिरतीचे काम असणाऱ्या लोकांनी या ऋतूमध्ये जास्त काळजी घ्यायला हवी. अन्यथा उष्माघात, उन्हाळी, अस्वस्थता अशा त्रासाला सामोरे जावे लागू शकते. ह्या उन्हाळ्याने आपल्याला आधीच जाचले आहे. थोडासा वातावरणात बदल करण्यासाठी आता बाहेर फिरायची सुद्धा सोय नाही. आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कडाक्याचे ऊन आहे. उकाडा चांगलाच जाणवत आहे. कडाक्याच्या उन्हात जपून राहण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात. मात्र तरीही नेमकेपणाने काय काळजी घ्यायला हवी, हे लक्षात घेतले पाहिजे.

उन्हाळ्यात खालील त्रास आपल्याला सहज जाणवतात :-

Advertisement

1) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे

२) उपयुक्‍त इलेक्‍ट्रोलाईट्‌ससुद्धा कमी होतात

Advertisement

३) स्नायूदुखी

४) रक्‍तदाब कमी जास्त होणे

Advertisement

४) चक्‍कर येणे

५) चिडचीड होणे

Advertisement

६) अतिशय घाम येणे

अशा विविध समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.

Advertisement

 

वरील समस्यांवर उपाय म्हणून तसेच उन्हाळा आहे म्हणून ही काळजी नक्कीच घ्या.

Advertisement

१) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोज 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.

२) आहारात जास्तीत जास्त प्रमाणावर फळे, फळांचा रस, ताक याचा समावेश करावा. फळे खाताय म्हणून जेवण करणे टाळू नका. तिन्ही वेळ योग्य आहार घ्या.

Advertisement

३) दोन्ही वेळेच्या जेवणात चौरस आहार घेण्याचा प्रयत्न करावा.

४) उन्हाळ्याच्या दिवसात पापड, भजी, लोणचे असे पदार्थ टाळावेत, त्याऐवजी दही, ताक इ. उष्णता कमी करणाऱ्या पदार्थाचा वापर करावा.

Advertisement

५) उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थ कमी खावेत.

६) उन्हाळ्यात प्रवास करताना पाणी बॉटल त्यात कधी पाणी यर कधी लिंबू सरबत न्यावा.

Advertisement

७) उन्हाळ्यात व्यायाम टाळणारे अनेक लोक आहेत. तसे करू नका. व्यायामामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्‍ती वाढते. उन्हाळ्यात उद्‌भवणाऱ्या विकारांवर मात करण्यासाठीही महत्त्वाची असते.

८) फार काळ उघड्यावर राहिलेले, रस्त्यावरील दुकानातील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

Advertisement