SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ सरकारी योजना देतेय 50 ते 80 टक्के अनुदान; महिला, पुरुष आणि शेतकऱ्यांना मिळणार जबरदस्त फायदा

देशातील शेतकरी बांधवांना सहज शेती करता यावी यासाठी केंद्र सरकारने स्माम (SMAM) किसान योजना 2022 सुरू केली आहे. आजच्या काळात शेतीसाठी आधुनिक उपकरणांची गरज आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 50 ते 80 टक्के अनुदान अर्थसहाय्य स्वरूपात दिले जाईल.

या योजनेचा लाभ अधिकृत वेबसाइट https://agrimachinery.nic.in/  द्वारे घेता येतो. या योजनेंतर्गत शेतकरी सहज शेतीसाठी आवश्यक उपकरण व साधन खरेदी करू शकतील. यामुळे शेतात पिकांचे उत्पादन वाढेल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल.

Advertisement

स्माम योजनेचा लाभ कोणासाठी ?

देशभरात शेती करणारा कोणत्याही शेतकऱ्याला या स्माम योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेतंर्गत महिला शेतकरीदेखील फायदा घेऊ शकतात. या योजनेद्वारे  केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते. त्याअनुषंगाने हे अनुदान देण्यात येते.

Advertisement

या योजनेचे फायदे :-

 • या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
 • या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीनुसार ५० ते ८० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 • स्माम (SMAM) किसान योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्याला या योजनेअंतर्गत सरकारकडून सबसिडी मिळू शकते.
 • या योजनेद्वारे शेतकरी शेतीची साधने सहज खरेदी करू शकतात.
 • उपकरणांच्या मदतीने पीक सुरक्षित ठेवता येते.
 • (SC, ST, OBC) वर्गाला या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे.
 • या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे सरकारकडून दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :- 

Advertisement
 • आधार कार्ड
 • निवास प्रमाणपत्र
 • ओळखपत्र
 • जमिनीचा तपशील जोडताना नोंद करण्यासाठी जमिनीचा अधिकार (आरओआर)
 • बँक पासबुक
 • मोबाईल नंबर
 • ओळखपत्राची प्रत (आधार कार्ड / ड्रायव्हर लायसन्स / मतदान ओळखपत्र / पॅनकार्ड / पासपोर्ट)
 • अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो