SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिवसेना,कॉंग्रेस नाही तर ‘राष्ट्रवादीच’ आहे फडणवीसांचे टार्गेट; 2 वर्षे आधीच केली ‘त्या’ गोष्टीची तयारी सुरु

अहमदनगर :

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून भाजपचे नेते मंडळी राज्यात शिवसेनेला तर राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेसला टार्गेट करत असतात. मात्र राजकारण हे खऱ्या अर्थाने जाणणारे तसेच अत्यंत अभ्यासू नेते म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीस याचे खरे टार्गेट कोण आहे, हे आता समोर आलेले आहे.

Advertisement

वेळोवेळी शिवसेनेला विविध मुद्यांवरून धारेवर धरणाऱ्या फडणवीस यांच्यावर आता एक महत्वाची जबाबदारी आलेली आहे आणि यातूनच हे समोर आले आहे की, फडणवीस यांचे टार्गेट ‘राष्ट्रवादीच’ आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली असताना भाजपने मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याअंतर्गत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे. यातील सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणजे अहमदनगर आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व आहे. ज्यात मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, रोहित पवार, संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे हे मागील विधानसभा निवडणूक विजयी झालेले उमेदवार आहेत. तसेच जिल्हा परिषदेही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

Advertisement

जाणीवपूर्वक अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी अंगावर घेऊन फडणवीस यांनी आपले नेमके टार्गेट काय, हे दाखवून दिले आहे. माजी मंत्री राम शिंदे, आमदार व खासदार विखे पिता-पुत्र असे मातब्बर नेते असताना देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती या अहमदनगर जिल्ह्यासाठी केली तीही अडीच वर्षे अगोदर… यावरून फडणवीस यांचे टार्गेट लक्षात येते.

2024 च्या निवडणुकीला तब्बल अडीच वर्ष शिल्लक असतानाच भाजपने प्रमुख डझनभर नेत्यांवर येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी दोन लोकसभा आणि बारा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. भाजपची कोअर कमिटीच्या बुधवारी (30 मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement