SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जागतिक घडामोडींचा परिणाम, जाणून घ्या आजचे बाजारभाव..!

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज (1 एप्रिल) सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.. सोन्या-चांदीच्या भावात कालही (31 मार्च) घसरण झाली होती. हा ट्रेंड नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आजही कायम राहिला.. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असल्याचे मानले जाते..

‘मल्टी कमॉडिटी एक्चचेंज’ (MCX)वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदे भाव (Gold Price Today) केवळ एका रुपयाने घसरुन 51,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. चांदीचा वायदे भावही 222 रुपयांनी घसरला असून, 67,265 रुपये प्रति किलोवर आला. आपल्या रेकॉर्ड भावापेक्षा सुमारे 6 हजार रुपयांनी चांदी स्वस्त आहे.

Advertisement

युद्ध संपल्यास सोने उतरणार

जागतिक बाजारातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सराफ बाजारात दिसत आहेत.. रशिया व युक्रेनमधील युद्ध संपल्यास सोन्याची मागणी कमी होईल व त्याच्या किमती कमी होऊ शकतात. सध्या रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून, ते त्यांना ग्लोबल मार्केटमध्ये विकायचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास, पुरवठा वाढेल व सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

Advertisement

तसे झाल्यास भारतीय बाजारात चांदी 66,550 रुपयांवर ट्रेड करण्याचा अंदाज आहे, तर सोनंही 50,550 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतं, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय..

दरम्यान, सोने खरेदी करताना, ग्राहकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हाॅलमार्क चिन्ह असेल, तरच सोन्याची खरेदी करावी.. हे हाॅलमार्क म्हणजे सोन्याची सरकारी हमी असते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement