SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कॅप्टन कुल म्हणून ओळख असणाऱ्या धोनीने रागात बॅट फेकून दिली आणि ….

भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याचे अनेक किस्से गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अनेक क्रिकेटर्सनेसोशल मीडियावर, इंस्टाग्राम लाइव्ह चॅटवर हे किस्से केले होते. कॅप्टन कुल म्हणून ओळख असणारा धोनी कसा? का? किती? रागावतो आणि रागवल्यावर काय करतो याचा एक भारी आणि भन्नाट असा किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी हा किस्सा सांगितला होतं भारताचा माजी स्विंग गोलंदाज इरफान पठाण याने. धोनी संघाचे नेतृत्व करताना किंवा ग्राउंड सराव करताना किती कुल असतो, असे आपण म्हणतो. किंवा खेळताना त्याचे वागणे, तसेच असते. एकदम कुल…. पण आता रागावलेल्या धोनीचा हा एक किस्सा समोर आला आहे कारण कुल असला तरीही तोही एक माणूस आहे.

हा किस्सा सांगताना इरफान म्हणाला ‘एकदा सराव करत असताना आम्हाला एक महत्त्वाचा बदल करायला लावला. जो उजव्या हाताने फलंदाजी करतो त्याने डाव्या हाताने फलंदाजी करावी, असे आम्हाला सांगण्यात आले होते. हा किस्सा 2006-07 या सालचा आहे.’

Advertisement

प्रत्येकाने हात बदलून फलंदाजी करण्याचा नियम होता आणि त्यावेळी नेमके धोनी फलंदाजी करत होता. एक क्षण असा आला की, फलंदाजी करताना धोनी आऊट झाला. पण त्याला वाटले की, आपण नॉट आऊट आहोत. त्याचा चेहरा नंतर रागाने लालेलाल झाला होता. राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण आउट असल्याचे समजताच धोनी जास्तच अस्वस्थ झाला आणि इतका रागावला की, त्याने आपली बॅट चक्क मैदानात फेकून दिली.

रागारागाने धोनी पुढे ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. त्यानंतर पुढच्या सरावासाठीही ठरलेल्या वेळेपेक्षा जरासा उशिराच मैदानात आला होता. त्यामुळे धोनीला राग येतो, ही गोष्ट खरी आहे, असे इरफान सांगतो.

Advertisement

हा किस्सा शेअर करताना इरफान धोनीची मजा घेत होता. धोनी रागावल्याचे इतरही अनेक किस्से असल्याचे इरफान आणि इतर टीममेट कायमच खाजगीत सांगतात.

Advertisement