SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय.., क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी..!

इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’च्या 15व्या पर्वाला जोरदार सुरुवात झालीय. रंगतदार सामन्यांनी ‘आयपीएल’ची उत्सुकता वाढलेली असताना, क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे..

‘आयपीएल’चे (IPL-2022) लिगमधील सगळे 70 सामने महाराष्ट्रात होत आहेत. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग कमी झाल्याने ठाकरे सरकारने एक एप्रिलपासून कोविडचे सारे निर्बंध हटवले आहेत. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्र आता मास्कमुक्त झाला आहे..

Advertisement

कोविडमुळे ‘आयपीएल’ सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने 25 टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहता येणार असल्याची अट घातली होती. मात्र, आता राज्य सरकारनेच सारे निर्बंध हटवल्याने ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांच्या उपस्थितीची अट शिथील करुन 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची मागणी होत होती..

6 एप्रिलपासून अंमलबजावणी

Advertisement

अखेर क्रिकेट फॅन्ससाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार येत्या 6 एप्रिलपासून ‘आयपीएल’ मॅचसाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या काही सामन्यांसाठी ही क्षमता 25 टक्के इतकी निश्चित करण्यात आली होती, आता ती वाढवलीय. ‘आयपीएल’चे तिकीट भागीदार ‘बूक माय शो’तर्फे ही माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रातील चार मैदानांवर यंदाची ‘आयपीएल’ खेळवली जात आहे. त्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबाॅर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम व पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचा समावेश आहे. कोरोनामुळे केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच या मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

Advertisement

प्रेक्षकांची उपस्थिती वाढणार..

आता ‘बीसीसीआय’नेही स्टेडियममधील प्रेक्षकांची उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता 25 टक्क्यांवरून 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार आहे. देशी-विदेशी प्रेक्षकांना जास्तीत जास्त संख्येने स्टेडियममध्ये येऊन थेट सामन्याचा आनंद घेता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

‘आयपीएल’मधील पुढील काही सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. त्यानुसार आता येत्या 6 एप्रिलपासून जादा संख्येने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन ‘आयपीएल’ सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement