SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत मोठा निर्णय, शिक्षण विभागाकडून सुट्ट्यांच्या तारखा जाहीर..!

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या.. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.. हे नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या न देता, पूर्ण वेळ शाळा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय शनिवारीही पूर्ण वेळ, तसेच रविवारीही ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते.

शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर अनेक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर या निर्णयात बदल करण्यात आला.. शाळांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्यास, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शाळा भरवण्याची गरज नसल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. 29) झालेल्या बैठकीत सांगितले होते..

Advertisement

2 मे ते 12 जूनपर्यंत शाळांना सुट्टी

उन्हाळी सुट्ट्या रद्द झाल्याने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, शिक्षण आयुक्तांनी अखेर गुरुवारी (ता. 31) शाळांच्या सुट्ट्यांच्या तारखाच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, येत्या 2 मे पासून ते 12 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

राज्यातील शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी दिली जाणार आहे.. ही सुट्टी पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळेल. सुट्टी संपली, की 13 जूनपासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे, मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता, विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरु होतील.

सणासुदीच्या सुट्ट्या वाढणार

Advertisement

उन्हाळ्याची सुट्टी कमी झाली असली, तरी नाराज होऊ नका.. कारण, या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव, नाताळच्या वेळेस मिळणार आहेत. त्याचे अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असतील. मात्र, या सुट्टया 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने गुरुवारी (ता. 31) राज्यातील सारे कोविड निर्बंध हटवल्याचे जाहीर केले.. शिवाय मास्कपासूनही नागरिकांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागानेही उन्हाळी सुट्ट्यांचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement