SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पॅनकार्ड – आधार ‘लिंक’ करण्याचा शेवटचा दिवस, लिंक न केल्यास होणार मोठे नुकसान..!

पॅनकार्ड व आधार कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे… मोदी सरकारने आता पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे.. बँकेपासून ते इन्कम टॅक्सपर्यंत विविध महत्त्वाच्या कामासाठी आधार व पॅन कार्ड लिंक असणं आवश्यक आहे, अन्यथा कोणताही आर्थिक व्यवहार करता येणे शक्य नाही..

खरं तर केंद्र सरकारने आतापर्यंत अनेकदा आधार व पॅन कार्ड हे लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली. गेल्या वर्षी सुरुवातीला 30 जूनपर्यंत मुदत होती. नंतर ती वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत केली. त्यानंतर त्यास पुन्हा एकदा 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती..

Advertisement

आधार व पॅन कार्ड लिंक(Adhar-Pancard link) करण्याची मुदत आज (ता. 31) संपत आहे.. त्यामुळे अजूनही हे काम करायचे राहून गेले असेल, तर तातडीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने अगदी घरबसल्या काही मिनिटांत आधार व पॅन कार्ड लिंक करता येणार आहे…

पॅनकार्ड निष्क्रिय केले जाणार
आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार व पॅन कार्ड लिंक करण्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, आता अखेरची मुदत आज (गुरुवारी) संपतेय.. आता यापुढे या कामासाठी आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे अंतिम मुदतीच्या आता आधार व पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते.

Advertisement

समजा, आजही (ता. 31) करदात्यांनी आधार व पॅन कार्ड लिंक केले नाही, तर पुढील तीन महिन्यांत म्हणजेच 30 जून 2022 पर्यंतही हे काम करता येईल, पण.. त्यासाठी 500 रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे आणि ही मुदतही उलटून गेली, तर मात्र 1000 रुपये दंड आकारला जाणार असल्याचे प्राप्तीकर विभागाने सांगितले..

विविध आर्थिक व्यवहारांसाठी आधार व पॅनकार्ड लिंक असणं अनिवार्य आहे. बँकेत खाते उघडणे, स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा ओळखीचा पुरावा, यांसारख्या विविध कामांसाठी पॅनकार्डचा वापर होतो. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास नागरिकांपुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात..

Advertisement

असे करा लिंक

  • सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा.
  • होम पेजवरील ‘लिंक आधार’ (Link Aadhaar) पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर नवीन विंडो उघडेल. त्यात संपूर्ण माहिती भरा. पॅन नंबर, आधार नंबरसह इतर माहिती व कॅप्चा कोड टाका.
  • पूर्ण माहिती भरल्यानंतर ‘लिंक आधार’ (Link Aadhaar) वर क्लिक करा. लगेच तुमचे आधार व पॅन कार्ड लिंक होईल.
  • पॅन आणि आधार लिंक झाले की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement