SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज स्वस्तात सोने-चांदी खरेदीची संधी, वाचा आजचे ताजे दर..

सोने-चांदीच्या दरामध्ये मागील काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळतेय. कधी सोनं महाग तर कधी स्वस्त अशी परिस्थिती असताना आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. आता लवकरच लग्नसराईचा काळ देखील सुरू होणार आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा उत्साह आता ग्राहकांमध्ये देखील दिसून येत आहे.

राज्यात आता दोन दिवसांनी गुढीपाडवा सण आहे. त्यामुळे या सणाच्या मुहूर्तावर काही ना काही जोरदार खरेदी करायची असेल, तर कमी झालेल्या सोन्याच्या भावामुळे सोनं खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर आज सोन्याचा भाव 0.51 टक्क्यांनी घसरून 51,510 रुपये प्रति तोळा झाला आहे, तर चांदीच्या किमतीत 1.10 टक्क्यांनी घसरण होऊन यानंतर चांदीचा भाव 66,667 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.

देशात सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने खरेदी करताना लोकांनी सोन्याची गुणवत्ता तपासून पाहावी. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच ग्राहकांनी ती खरेदी करावी.

Advertisement

(वरील सोने-चांदीच्या किंमती ऑनलाईन आहेत. वेगवेगळ्या शहरांनुसार त्यांच्या दरामध्ये किंचित फरक असू शकतो. अचूक दरासाठी स्थानिक ज्वेलर्सला संपर्क करा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement