SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता तुमचे पाय सांगतील की तुम्ही नशीबवान आहात की नाही, कसं ते घ्या जाणून..

आपण लहानपणी ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ म्हण तर ऐकलीच असेल. तर आम्ही आज तुम्हाला असंच काहीतरी सांगणार आहोत, जेणे करून तुमचे पाय काय सांगण्याचा किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न करतात हे समजेल. अनेक सिनेमांमध्ये ज्योतिषाकडे हात दाखवताना तुम्ही पाहिलं असेल किंवा काही ठिकाणी तुमचे आई, वडील, आजोबा त्यांच्या काळात कुठे ना कुठे हात दाखवायला किंवा घरातील काही समस्या घेऊन तोडगा विचारण्यासाठी जात असतील. तेव्हा हात दाखवून अनेक ऐकलेल्या अंदाजांवर विश्वास ठेवला जायचा. तेव्हा तळहाताच्या रेषांवरून कौटुंबिक अडचणी आणि लग्नाच्या समस्या व इतर काही समस्यांवर उपाय मागण्यासाठी लोक जात असत.

हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे आपल्या तळहातावर भाग्यरेषा असते, असं म्हणतात तसेच माणसाच्या तळपायावर उभी रेषा असते आणि ही उभी रेषा खूप काही सांगते. पायावर जर उभी रेषा असेल तर ती जितकी लांब आणि सखोल, स्पष्ट असेल तितकी ती व्यक्ती खूप चांगली आणि नशीबवान असते असं म्हणतात. हस्तरेषा शास्त्रानुसार, आपल्या पायावरील या रेषेची सुरुवात जर टाचेच्या खालच्या भागापासून सुरू झाली तर आणखी शुभ फल देते.

Advertisement

तुमची बोटे आणि रेषा असेच तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काय सांगणायचा प्रयत्न करतात म्हणून हे जाणून घ्या. जर तळपायावर उभ्या रेषेच्या खाली तीन रेषा असतील आणि तिन्ही रेषा एका ठिकाणी एकत्र येत असतील आणि तिथून एक रेषा सरळ बोटांच्या दिशेने जात असेल तर अशा व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद आणि यश मिळते.

जर तुमच्या पायाच्या तळापासून मधल्या बोटापर्यंत एखादी रेषा जात असेल तर तिला तिला मद रेषा म्हणतात. ज्या व्यक्तीच्या पायावर अशी रेष असते ती व्यक्ती मनाने मोठी आणि उदार असते. ही रेषा तळपायाच्या केवळ एक चतुर्थांश भागात असते आणि ती खूप शुभ मानली जाते.

Advertisement

जर समजा तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याखाली असलेल्या बोटाच्या रेषेखाली कोणतीही रेषा दिसत असेल तर तिला द्वास्था रेषा म्हणतात. कोणाच्या डाव्या पायावर जर ही रेषा तुम्हाला दिसली तर समजून जा की ती व्यक्ती श्रीमंत, यशस्वी आणि सद्गुणी असतो. ही रेषा जेवढी लांब असते तेवढा ती शुभ परिणाम देते.

तुमच्या पायावर जर उभ्या रेषेप्रमाणे इतर दुसरी कोणतीही रेषा असली तर तिला शाकटायिनी रेषा असं म्हटलं जातं. शाकटायिनी रेषा उभ्या रेषेप्रमाणेच तुम्हाला शुभ परिणाम देते. जर ही रेषा कोणाच्या पायावर असेल तर त्या व्यक्तीला धन, वैभव, सुख, मान आणि आरोग्य अशा गोष्टी प्राप्त होतात.

Advertisement

यासोबतच जर आपल्या घरातील किंवा तुम्हाला दिसणाऱ्या कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या पायाची बोटे सारखी असतील आणि अंगठा लांब असेल तर अशा व्यक्तीला कलेत जास्त रस असतो. अशा लोकांना बारीकसारीक गोष्टींचं स्पष्टीकरण नेहमी लागतं, प्रत्येक गोष्टीत खूप बारकाईने संशोधन करून ते यश मिळवतात. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या पायाची बोटे एकसमान असतील तर अशी व्यक्ती सहन करणारी असते. ती सहसा चुकत नाही, त्यांच्याकडे पैसे असतात. तसेच ते कंजुषी देखील करतात. अशा व्यक्ती बोलायला गोड असतात आणि त्या घरात सर्वाना सारखं माप देतात. अशी व्यक्ती मजबूत असते. अशा लोकांना इतरांवर आपला प्रभाव दाखवण्याची सवय असते.

(वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. लेखातील अंदाजांवरून स्प्रेडइट ची मते प्रतिबिंबित होत नाहीत म्हणून लेखातील काही गोष्टींचे उत्तरदायित्व स्प्रेडइट स्वीकारत नाही.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement