SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकांना एप्रिल महिन्यात आहेत ‘एवढ्या’ सुट्ट्या, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी..

देशात मार्च महिन्याअंती बरीच कामे राहून जातात. जर तुमची बँकांची कामं राहिली असतील किंवा आधार-पॅन लिंक करायचे राहिले असेल तर ते आज करून घ्या. याशिवाय पैसे काढणे-भरणे, चेकविषयी कामे व इतर कामे पुढील महिन्यात सुट्ट्यांचे नियोजन पाहून करून घ्या. कारण यानंतर एप्रिल महिन्यामध्ये अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे.

माहीतीनुसार, एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुमचा सतत बँकेतील कामांशी संबंध येत असेल, तर तुम्हाला बँकांची कामे करण्यासाठी खास नियोजन आखावं लागेल. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे
(Public Holidays) एप्रिल महिन्यात बँकेंच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात तुमची कामे उरकून घ्या. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, वीकेंड वगळून एप्रिल महिन्यामध्ये बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

Advertisement

एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in April 2022):

▪️ 1 एप्रिल – मागील सरत्या आर्थिक वर्षाचा हिशेब करण्यासाठी काही बँका सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहतील.

Advertisement

▪️ 2 एप्रिल – महाराष्ट्रात मराठी नववर्ष सुरू होत असल्याच्या दिवशी म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील. तर याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात उगाडी सणानिमित्त बँकांना सुट्टी आहे.

▪️ 3 एप्रिल – गुढीपाडवा सण झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच रविवार येतो, त्यामुळे बँकाना सुट्टी आहे.

Advertisement

▪️ 9 एप्रिल – तसेच, दुसरा शनिवार असल्याने 9 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी राहणार आहे.

▪️ 10 एप्रिल – दुसरा रविवार (रामनवमी) असल्यामुळे बँकांना 10 एप्रिल रोजीही सुट्टी असणार आहे.

Advertisement

▪️ 14 एप्रिल – राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलला असते, यावेळी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महावीर जयंती, वसंत पंचमी, बैसाखी, तामिळ नवीन वर्षानिमित्त ही राष्ट्रीय सुट्टी असेल.

▪️ 15 एप्रिल – गुड फ्रायडेनिमित्तही बँकांना सुट्टी असते.

Advertisement

▪️ 23 एप्रिल – एप्रिल महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

▪️ 24 एप्रिल – महिन्यातील चौथा रविवार असल्यामुळे बँकेला 24 एप्रिल रोजीही सुट्टी असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement